esakal | 'स्वतःला वाघिण म्हणवतेस पण...' मिक्का सिंगने लगावला कंगनाला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

mika kangna

दिलजीत आणि कंगना या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. या वॉरमध्ये आता गायक मिक्का सिंगने देखील उडी घेतली आहे. 

'स्वतःला वाघिण म्हणवतेस पण...' मिक्का सिंगने लगावला कंगनाला टोला

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- सध्या देशभरात एकाच गोष्टीवर चर्चा होतेय ते म्हणजे शेतकरी आंदोलन. या आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्याने अभिनेत्री कंगना रनौत चांगलीच ट्रोल झाली आहे. कंगनाचा या आंदोलनाला विरोध आङे तर बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता दिलजीत दोसांज. दिलजीत आणि कंगना या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. या वॉरमध्ये आता गायक मिक्का सिंगने देखील उडी घेतली आहे. 

हे ही वाचा: अक्षय कुमारला थेट अयोध्येत 'या' सिनेमाचं शूटींग करण्यासाठी मिळाली परवानगी   

प्रसिद्ध गायक मिका सिंहने कंगनावर निशाणा साधत ट्विट केलं आहे. ''आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?'' असा सवाल त्याने कंगनाला केला आहे. “आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणं सोपं आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही.” असं ट्विट करत मिक्कानं कंगनावर थेट निशाणा साधला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. 

शेतकरी आंदोलनातील एक आजी सोशल मीडियावर चर्चेत आल्या पासून अभिनेत्री कंगना रनौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली. कंगनाने नुकतंच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल होतोय. 

mika singh slams kangana ranaut says being a sherni on twitter is no big deal  

loading image
go to top