मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताचा २९वा वाढदिवस केला खास पद्धतीने साजरा, सुरुवात २९ कि.मी धावण्यापासून

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 31 August 2020

मिलिंद यांनी पत्नी अंकिताचा २९ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. सोशल मिडियावर त्यांनी हे फोटो शेअर केले असून या पोस्टवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.

मुंबई- फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमण आणि पत्नी अंकिता कुंवर बॉलीवूडच्या त्या कपल्सपैका एक आहेत जे फिटनेससाठी सगळ्यात जास्त धावांचा विक्रम करतात. मिलिंद यांनी पत्नी अंकिताचा २९ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. सोशल मिडियावर त्यांनी हे फोटो शेअर केले असून या पोस्टवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.

हे ही वाचा: एका 'स्टार'ने सुशांतचं करिअर संपवण्याची दिली होती धमकी, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा धक्कादायक खुलासा

अभिनेते मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त घरी एका शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्य सहभागी होते. या वाढदिवसाच्या पार्टीचे काही खास क्षण त्यांनी सोशल मिडियावर फोटोच्या स्वरुपात शेअर केले आहेत. मिलिंद यांनी हे फोटो पोस्ट करताना फॅमिली टाईम असं कॅप्शन देत लिहिलं आहे, 'हॅप्पी बर्थडे टु माय स्वीटहार्ट अंकिता'.

 

अंकिताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र आले होते आणि हा वाढदिवस खास बनवला. मिलिंद यांनी अंकिताची स्तुती करत काही खास गोष्टी लिहिल्या आहेत. मात्र यातील सगळ्यात महत्वाची आणि खास गोष्ट ही आहे की अंकिता तिच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त अगदी सहजपणे २९ किलोमीटर धावली. मिलिंद यांनी ही गोष्ट सांगताना लिहिलंय मला तिचा अभिमान वाटतो.

29-29-

मिलिंद आणि अंकिता हे सोशल मिडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नेहमीच त्यांच्या चाहत्यांनी फिटनेसचे धडे देत असतात. मिलिंद आणि अंकिताच्या वयामध्ये २५ वर्षांचा फरक आहे. मात्र त्यांच्या फिटनेस आणि रोमान्समध्ये त्यांचं वय कधीच आड आलं नाही. दोघांनी अनेक चर्चांनंतर २०१८मध्ये लग्न केलं होतं.     

milind soman hosted a party and celebrates wife ankita konwar 29th birthday shares pictures  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milind soman hosted a party and celebrates wife ankita konwar 29th birthday shares pictures