मिलिंद सोमणला दिलं चाहत्याने चॅलेंज; म्हणाला, 40 पुशअप्स काढतो पण...

उद्याच्या चांगल्यासाठी आजच सुरुवात करा; मिलिंद सोमण
Milind Soman
Milind SomanEsakal

मुंबई: मॉडेल,अभिनेता आणि फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमण (Milind Soman)नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतो. आता ही त्याने पुशअप्स संदर्भात एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मिलिंद सोमण यांच्या फिटनेसची भुरळ तरुणवर्गात खूप आहे. आता त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे तो युवती आणि युवकांनी फिट रहाव या संदर्भात आहे.

सोमानी सोबत जर सेल्फी काढायचा असेल तर तरुण किंवा तरुणींनी पुशअप्स काढावे लागतील असा नियम त्याने घातला आहे. सध्या या व्हिडीओ चाहत्यांनी चांगलीच पसंदी दर्शवली आहे. तर चक्क एका चाहत्यांने सोमानी यांना चॅलेंज केले आहे. त्याने या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे, मी दररोज 40 पुशअप्स काढेन परंतु तुम्ही आमच्या चिपळूणजवळील ४३ एकर शेताला भेट द्यायला यायला पाहिजे.अशी अट घातली आहे.

उद्याच्या चांगल्यासाठी आजच सुरुवात करा

या पोस्टमध्ये सोमानी म्हणतो, उद्याच्या चांगल्यासाठी आजच सुरुवात करा. सध्याचे युग हे सेल्फीचे आहे. मात्र सेल्फीसाठी मी एक नविन नियम घातला आहे. ज्याला माझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे त्यांनी पुशअप्स घालायच्या. यासाठी मुलींनी किमान 10 तर मुलांनी कमीतकमी 20 पुशअप्स घातल्या पाहिजेत. सर्वांनी फिट रहावा अस त्याच मत आहे.

तो म्हणतो माझी आई वयाच्या 80 व्या वर्षी साडी नेसून दोरीवरच्या उड्या, पुशअप्स असे व्यायामाचे प्रकार सहजपणे करते. तुम्हीही सहज कराल. एकदा सुरुवात तर करुन बघा. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की, तुम्ही हे करू शकता आणि कदाचित तुम्हाला आणखी करण्यास प्रवृत्त करेल. स्वतःची काळजी घ्या. हा नियम सर्वाना आहे. परंतू गर्भधारणा झालेली स्त्री किंवा नुकतीच दुखापत झालेल्या व्यक्तीला हा नियम नाही. मिलिंदसोबतच त्याची पत्नी अंकिता कोनवार आणि आई उषा सोमण हेसुद्धा फिटनेस फ्रिक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com