मिर्झापूर'चा तिसरा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mirzapur third seson coming soon amazon announced

मिर्झापूरच्या दोन्ही सीझनला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. मागील महिनाभरापासून त्याच्याविषयी सगळीकडे चर्चा होती. सोशल मीडियावरही त्याच्यातील कलाकार, संवाद यांचे ट्रेंड सुरु होते.

मिर्झापूर'चा तिसरा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला

मुंबई -  मिर्झापूरचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी रात्र जागून तो पाहिला. त्याची खूप चर्चाही झाली. त्यातील कलाकारांचे चाहत्यांनी कौतूकही केले. दुस-या भागाच्या शेवटी मुन्ना भैय्याला मारल्यानंतर कालीन भैय्या जखमी अवस्थेत अजून जिवंत असल्याचे दाखविण्यात आले होते. यावरुन मिर्झापूरचा 3 सीझन येणार असल्याचे चाणाक्ष प्रेक्षकांनी ताडले होते. आता तर अॅमेझॉनच्या वतीने 3 -या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 

मिर्झापूरच्या दोन्ही सीझनला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. मागील महिनाभरापासून त्याच्याविषयी सगळीकडे चर्चा होती. सोशल मीडियावरही त्याच्यातील कलाकार, संवाद यांचे ट्रेंड सुरु होते. यावरुन त्याची लोकप्रियता किती होती हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. तर आता त्याच्या 3 सीझनची तयारी सुरु करण्याचे आदेश संबंधित निर्मात्यांनी दिले आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना एक्सेल एन्टरटेन्मेंटचे निर्माते रितेश सिधवानी म्हणाले, दोन दमदार सीझनमध्ये मिर्झापूरने संपूर्ण मनोरंजनाच्या जगात धमाका केला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सहकार्याशिवाय हे घडविणे अशक्य होते. रिलीजच्या काही दिवसांतच सोशल मीडियावरील प्रतिक्रियेतून या शोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे अतूट प्रेम, या नवीन सीझनमध्ये सुद्धा दिसून आले आहे.

मिर्झापूर २मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, श्वेता त्रिपाठी शर्मा रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर यांच्या प्रमुख भूमिका असून सोबतच अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चड्डा, मनुषि चड्ढा आणि राजेश तैलंग या कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे या मालिकेला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे . केवळ भारतातच नव्हे तर या सीरिजला जगभरातून मोठ्या प्रमाणात कौतुक व प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.  विशेष म्हणजे, या सीझनमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेण्युली आणि ईशा तलवार यांचा अभिनयही रसिकांच्या पसंतीस पडला आहे.

मिर्झापूरचे जग सत्ता, राजकारण आणि सूडाच्या भोवती वावरत आहे. त्यात असणा-या स्त्रिया त्यांची सुडभावना आणखी टोकाची झाली आहे. त्यासाठी त्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतात याचा प्रत्यय या सीझनमध्ये प्रेक्षकांनी घेतला आहे.    मिर्झापूर ताब्यात घेण्यासाठी मुन्ना आणि गुड्डू यांच्यातली लढाई विकोपाला जाते तर दुसरीकडे कथानक आपल्याला राजकीय शक्ती च्या गल्ली मध्ये नेवून सोडते जिथे राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील गूढ परस्परसंबंध पाहण्यास मिळतो.

2 -या सीझनमध्ये देखील गुड्डु भैयाचा संघर्ष हा काही संपलेला नाही. त्याचा प्रतिशोघ अद्याप सुरु आहे. या सीझनमध्ये त्याची इच्छा पूर्ण होईल असे वाटत असतानाच त्यात अनेक वळणे आली आहेत. आता 3 -या सीझनमध्ये नेमकं काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रेक्षकांना आता या ३ -या भागाचे वेध लागले आहेत. शेवटी कोण जिंकेल? त्रिपाठींना आव्हान देण्यासाठी कोणी उरले आहे का? या सीझनमध्ये नियम तसाच राहतो - रक्त सांडल्याशिवाय येथे कुणीही टिकणार नाही परंतु पडदा मात्र व्यापक होतो.
 
 

loading image
go to top