esakal | पोलिसांकडून अपमान; 'मिस इंडिया ताजच्या' आईनं केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

 Riya Raikwar

पोलिसांकडून अपमान;'मिस इंडिया ताजच्या' आईनं केली आत्महत्या

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मिस इंडिया ताज प्रिन्सेसचा किताब जिंकणाऱ्या (Riya Raikwar) रिया राईकवार (Sudha raikwar commits suicide) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिच्या आईनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दुसरीकडे याप्रकरणाबाबत आपल्याला पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार रियानं केली आहे. ज्यावेळी आपण पोलिसांकडे गेलो तेव्हा त्यांनी आईच्या भावाला लॉकअपमध्ये (lock up) टाकले असं रियानं सांगितलं आहे. रियाची आई आपल्या मुलाच्या अपहरण झाल्याची तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. मात्र त्यांना त्याठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाली.

पोलिस ठाण्यात झालेला अपमान सहन न झाल्यानं आईनं घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रिया एक प्रोफेशनल फॅशन मॉडेल आहे. तिनं मिस इंडिया ताजचा किताब (miss india taaj) आपल्या नावावर केला आहे. वास्तविक रियाची आई सुधा राईकवार या मुलाचे अपहरण झाले अशी तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना सकाळ पासून थांबवून ठेवले. सायंकाळ झाली तरी त्यांनी त्यांची तक्रार नोंदवली नाही.

हेही वाचा: 'नामकरण' फेम अनायाचे दोन्ही किडनी निकामी; उपचारासाठी पैशांची गरज

हेही वाचा: आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर

ज्यावेळी रिया राईकवार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आल्या तेव्हा पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. पोलिसांनी तक्रार नोंदविण्याऐवजी वेळकाढूपणा केला. तक्रार देण्यासाठी सकाळी आलेल्या रियाच्या आईची तक्रार सायंकाळपर्यत नोंदवली गेली नाही. दुसरीकडे त्यांच्या भावाला तुरुंगामध्ये टाकण्यात आले. यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. या कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, रियाचे वडिल फायन्सासचे काम करायचे. त्यामध्ये त्यांनी अनेक लोकांना गंडा घातला आहे.

loading image