मिस युनिव्हर्स हरनाज संधूने सांगितली होती पास्ता बनवण्याची रेसिपी

मालिकेत हरनाज संधूने छोटीशी भूमिका साकारली होती
Harnaaz Sandhu
Harnaaz SandhuHarnaaz Sandhu

‘मिस युनिव्हर्स २०२१’ हरनाज संधू (Miss Universe Harnaaz Sandhu) सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा आहे. भारताला तब्बल २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा ताज मिळवून दिल्यानंतर हरनाजचे फोटो आणि व्हिडिओ (video viral) इंटरनेटवर सतत व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये हरनाजचा एक जुना व्हिडिओ देखील आहे. ज्यामध्ये ती हिंदी मालिकेत दिसत आहे.

हा व्हिडिओ ‘उदारियां’ या मालिकेतील आहे. या मालिकेत हरनाज संधूने छोटीशी भूमिका साकारली होती. मालिकेच्या एका भागात हरनाज ‘ब्यूटी शो’ची स्पर्धक म्हणून दिसत आहे. शोमध्ये ती लोकांना पास्ताची रेसिपी (Pasta recipe) सांगताना दिसली होती. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, झुमके व बांगड्या घालून हरनाज खरोखरच एखाद्या ब्यूटी क्वीनसारखी दिसते. हरनाजचा हा कॅमिओ तेव्हा कोणाच्याच लक्षात आला नसेल; परंतु, आज करोडो लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर पाहायला मिळत आहे.

Harnaaz Sandhu
प्रियांकामुळे एमएस धोनीची चर्चा; तो फोटो होतोय व्हायरल

हरनाज संधूला लहानपणापासूनच शोबिझच्या झगमगाटाची आवड होती. २०१७ मध्ये तिने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. एका वर्षानंतर २०१८ मध्ये हरनाजला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८चा मुकुट देण्यात आला होता. दोन प्रतिष्ठित पुरस्कार जिंकल्यानंतर हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला होता. जिथे तिने टॉप १२ मध्ये स्थान मिळवले होते. मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी हरनाझ तिसरी भारतीय आहे.

हरनाजचे येणार दोन चित्रपट

हरनाजला (Harnaaz Sandhu) मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी काही कालावधी शिल्लक असला तरी ती छोट्या पडद्यावर (TV show) खूप आधीपासून दिसली आहे हे या व्हिडिओवरून दिसून येते. हरनाज ‘बाई जी कुटंगे’ आणि ‘यारा दियां पू बरन’ या दोन पंजाबी चित्रपटांमध्ये (Punjabi movie) दिसणार आहे. तिचे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com