ना सेलिब्रिटी ना श्रीमंत; हरनाज संधू फक्त त्याच व्यक्तीला करणार डेट

Miss Universe Harnaaz Sandhu
Miss Universe Harnaaz Sandhue sakal

नवी दिल्ली : हरनाज संधूने (Miss Universe Harnaaz Sandhu) भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिने तब्बल २१ वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब भारताला मिळवून दिला. मिस युनिव्हर्स होणारी ती तिसरी भारतीय असून यापूर्वी सुष्मिता सेन आणि लारा दत्तानं हा मान मिळविला होता. आता हरनाजने स्वप्नातला राजकुमार म्हणजेच ती कोणाला डेट करणार आहे? आणि बॉलीवूडमधील एंट्री (Harnaaz Sandhu Bollywood Entry) याबाबत हरनाजने अनेक खुलासे केले आहेत.

मिस युनव्हर्स झाल्यानंतर लारा दत्ता आणि सुष्मिता सेनला भेटली काय? -

मिस युनिव्हर्सचा किताब मिळाल्यानंतर दोघीहींनी मला शुभेच्छा दिल्या. पण, आतापर्यंत आम्ही भेटलो नाही. कारण कोरोनाचा काळ सुरू आहे. त्यात मी क्वारंटाईन होते. त्या देखील त्यांच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. आता माझं क्वारंटाईन संपल्यानंतर भेटण्याचा विचार करतेय, असं हरनाज इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली.

'त्या' वादग्रस्त ठरलेल्या प्रश्नावर काय म्हणाली हरनाज? -

ग्रँड फिनालेदरम्यान, स्टीव्ह हार्वेने तुला जागतिक मंचावर प्राण्यांची नक्कल करण्यास सांगितले. मिस युनिव्हर्स सारख्या व्यासपीठावर हा प्रश्न विचारणे योग्य नाही असं म्हणत अनेकांनी टीका केली. जेव्हा तुला हा प्रश्न विचारला तेव्हा तुला काय वाटलं? असं विचारलं असता, हरनाज म्हणाली, ''हा प्रश्न सौंदर्य स्पर्धेसाठी अयोग्य होता, असं तुम्हाला का वाटतं? स्टीव्हने विचारलेला प्रश्न मला आवडला. त्यामुळे मला माझ्यातील कौशल्य मंचावर दाखविण्याची संधी मिळाली.''

Miss Universe Harnaaz Sandhu
पार्टी मेकअप करायचायं ; 'हरनाज संधू'च्या टिप्स करा फाॅलो

हॉलीवूडने कॅटवूमनची संधी दिली तर काय करशील? -

मला महिला सक्षमीकरण करायचे आहे. स्त्रिया काय आहेत आणि काय असू शकतात याची सशक्त पात्रे निवडून एकाच वेळी अभिनय करणे आणि स्टिरियोटाइप मोडणे ही माझी आवड आहे. तर, हॉलीवूडने ही संधी दिली तर नक्कीच आवडेल, असं हरनाज म्हणाली.

बॉलीवूडसाठी तुझे प्लॅन काय आहे? -

आता कुठं माझं करिअर सुरू झालं आहे. त्यामुळे बॉलीवूडचे प्लॅन आताच घोषित करणे खूप घाईचे ठरेल. बॉलीवूडचा मी विचार करेन तेव्हा सर्वांना स्वतः माहिती देईन, असं हरनाज म्हणाली.

Miss Universe Harnaaz Sandhu
हरनाज संधू म्हणाली,''बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री माझं प्रेरणास्थान''

बॉलीवूडमध्ये या अभिनेत्रींसोबत काम करायला आवडणार -

बॉलीवडूमध्ये संधी मिळाल्यानंतर सहकलाकार म्हणून कोणासोबत काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता, हरनाज म्हणाली, '' प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, सुष्मिता सेनसोबत मला काम करायला आवडेल. या सर्वांच्या भूमिका असलेला महिला सशक्तीकरणाबाबत एखादा चित्रपट बनवला तर तो किती चांगला प्रतिसाद मिळेल? असा विचार माझ्या मनात येतो.''

हरनाज करणार या व्यक्तीला डेट -

एकदम हँडसम दिसणारा श्रीमंत मुलगा किंवा खूप मेहनती मुलगा दोनपैकी कोणाला तू डेट करशील? असा प्रश्न विचारला असता हरनाजने एकदम बिनधास्त उत्तर दिले. मला मेहनती मुलासोबत डेट करायला आवडेल. कारण, मी स्वतः खूप मेहनत करून पुढे आली आहे आणि आता देखील मेहनत करत आहे. मेहनत करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला मिळालेल्या यशाची खरी किंमत कळते, असं हरनाजनं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com