कमाल! वडील कचरा उचलतात आई झाडू मारते...अन् पोरगी गाजवतेय मिस युनिव्हर्स 2022 ची स्पर्धा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमाल! वडिल कचरा उचलतात आई झाडू मारते...अन् पोरगी गाजवतेय मिस युनिव्हर्स 2022 ची स्पर्धा..

कमाल! वडील कचरा उचलतात आई झाडू मारते...अन् पोरगी गाजवतेय मिस युनिव्हर्स 2022 ची स्पर्धा..

मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणे सोपे नसते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ड्रेस पासून ते आपल्या प्रत्येक स्टाइलवर पूर्वतयारीला खुप खर्च होतो. पण काही झालं तरी स्पर्धेत सहभागी होण्याचा काही जणींचा उद्देश असतो. सध्या मिस युनिव्हर्स 2022 ची स्पर्धा सुरु आहे. तेव्हा थायलंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अॅना सुएंगम आयमने असेच काहीसे केले आहे की तीला कौतुकाची थाप पडली आहे.

हेही वाचा: Miss Universe 2022 ची धुरा हिच्या एकटीच्या खांद्यावर..भयानक होतं बालपण..कोण आहे अरबपती ट्रान्सवुमन Anne?

गेल्या बुधवारी रात्री मिस युनिव्हर्स 2022 ची प्राथमिक स्पर्धा होती. या स्पर्धेत जगभरातील ब्युटी क्वीनने एकापेक्षा एक ड्रेस परिधान केले होते. तर अॅनाने महागड्या फॅब्रिकपासून बनवलेल्या हाय-एंड डिझायनर ड्रेसऐवजी सोडा कॅन टॅब खेचून बनवलेला अपसायकल ड्रेस निवडला. अॅनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजद्वारे जगाला सांगितले की तिने हा अनोखा गाऊन का घातला.

इंस्टाग्राम कॅप्शननुसार अॅना लिहिते, 'हा गाऊन माझ्या कुटुंबाकडून प्रेरित आहे. माझे आई-वडील रॅग वेचक म्हणून काम करायचे. माझे बालपण कचऱ्याचे ढिगारे आणि पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंमध्ये गेले. हा अनोखा गाऊन 'कॅन टॅब' कचरा आणि पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवला आहे. मला जगाला सांगायचे आहे की अनेक लोक ज्या गोष्टी निरुपयोगी मानतात त्या गोष्टींचे मूल्य आणि सौंदर्य असते."

हेही वाचा: Miss Univers 2022 विश्व सुंदरी! पाहा.. मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेली दिविता राय आहे तरी कोण?

अॅना सुएंगम आयमने 30 जुलै 2022 रोजी मिस थायलंडचा किताब पटकावला. आता ती मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे. अॅना सुएंगम आयमची घरची परिस्थिती चांगली नाही. तिचे वडील कचरा उचलतात आणि आई रस्ते झाडते. तरीही तिच्या आई वडिलांनी कोणतीही कमतरता तिला भासू देत नाही. जीवनात आपण कितीही पुढे गेलो तरी आपण जिथून सुरुवात केली ते कधीही विसरू नये हे तिने लक्षात ठेऊन त्याचा उपयोग स्पर्धेमध्ये केला आहे.

सोशल मीडियावरही अॅनाच्या गाऊनचे आणि तिच्या स्पिरिटचे कौतुक होत आहे. अनेक लोक अॅनाला 'द गार्बेज ब्युटी क्वीन' असेही म्हणतात. अॅनाचा अपसायकल केलेला गाऊन हा सोडा ड्रिंक कॅन आणि स्वारोवस्की क्रिस्टल्सच्या पुल-टॅबपासून बनवला होता. हे थाई फॅशन ब्रँड मनीरातने डिझाइन केला आहे. दरम्यान दिविता राय मिस युनिव्हर्स 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.