
तुम्हाला पण लग्नात मितालीसारखा लूक हवाय का? मग हे नक्की वाचा
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी २४ जानेवारी रोजी पुण्यातील ढेपे वाडा याठिकाणी लग्नगाठ बांधली. महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नातील विधींसाठी मितालीने नऊवारी साडी आणि पारंपरिक लूकला प्राधान्य दिलं होतं. मितालीने लग्नाची शॉपिंग कुठून केली याबद्दलची उत्सुकता चाहत्यांमध्ये असतानाच तिने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग'च्या (ask me anything) सेशनदरम्यान चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत.
लग्नासाठीची शॉपिंग कधीपासून सुरू केली?
मितालीचं उत्तर- आम्ही जून २०२० मध्ये लग्न करणार होतो, त्यामुळे फेब्रुवारी २०२० मध्येच शॉपिंगला सुरूवात केली होती. पण करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली.
लग्नाच्या शॉपिंगसाठी काही विशेष निकष होते का? सगळ्या गोष्टी कशा सांभाळून घेतल्यास?
मितालीचं उत्तर- लग्नासाठी मला पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक पाहिजे होता. नऊवारी, खोपा, चंद्रकोर या सर्व गोष्टी मला पाहिजे होत्या. त्यानंतर बाकी गोष्टी सांभाळण्यासाठी शिवानी पाटीलने माझी फार मदत केली.
हेही वाचा : सिद्धार्थ-मिताने लग्नानंतर निवडलं महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण, जाणून घ्या किंमत
मेहंदीच्या कार्यक्रमासाठी कपडे कुठून विकत घेतलेस?
मितालीचं उत्तर- आंबराई (@ambraee_)
लग्नातील हिरवी नऊवारी साडी कुठून विकत घेतलीस?
मितालीचं उत्तर- सिल्क पॅलेस, विलेपार्ले
लग्नातील पिवळी नऊवारी साडी कुठून विकत घेतलीस?
मितालीचं उत्तर- दादर इम्पोरिअम
रिसेप्शनसाठीची बनारसी साडी कुठून विकत घेतलीस?
मितालीचं उत्तर- सिल्कलाइन इथनिक (@silkline_ethnic)
लग्नात महाराष्ट्रीयन लूक ठेवण्याची कल्पना कोणाची होती?
मितालीचं उत्तर- मला खरंतर लग्नात लेहंगा परिधान करायचा होता, पण आरती वडगबाळकरने माझं मन बदललं आणि त्यासाठी मी तिची खूप आभारी आहे.
रिसेप्शनसाठी अनुष्का शर्मासारखा लूक करण्याचा विचार होता का?
मितालीचं उत्तर- अनेकांनी मला हा प्रश्न विचारला. पण रिसेप्शनच्या लूकसाठी माझ्या मनात अनुष्का किंवा दीपिका यांपैकी कोणाचाही विचार नव्हता. मला खरंतर शमिका भिडेच्या रिसेप्शनची साडी फार आवडली होती. ती लाल बनारसी साडीत खूपच सुंदर दिसत होती आणि तिच्याकडे पाहूनच मला बनारसी साडीची कल्पना सुचली. मेकअप केल्यानंतर माझा लूक अनुष्का शर्माच्या रिसेप्शन लूकसारखा दिसू लागला होता आणि ही माझ्यासाठी चांगलीच गोष्ट होती.