राज ठाकरे 'पानिपत'च्या प्रेमात; म्हणाले...

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 डिसेंबर 2019

'पानिपत' या हिंदी चित्रपटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले.

मुंबई : 'पानिपत' या हिंदी चित्रपटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले. पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता, अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवर देत त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप           

पानिपत या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले. तर निर्माता सुनीता गोवारीकर, रोहित शेलाटकर हे आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित या चित्रपटाचे कौतुक केले. 

त्यामध्ये ते म्हणाले, मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पाहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत चित्रपट. फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे  तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पाहायला हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray Praises Movie Panipat