'मनी हाईस्टचा प्रोफेसर' झळकला मुंबई - हैद्राबादच्या भिंतीवर

मनी हाईस्ट नावाच्या मालिकेनं जगातील अनेकांचं लक्ष वेधलं होतं.
'मनी हाईस्टचा प्रोफेसर' झळकला मुंबई - हैद्राबादच्या भिंतीवर

मुंबई - मनी हाईस्ट नावाच्या मालिकेनं जगातील अनेकांचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यत वेब मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून मनी हाईस्टचे नाव घेता येईल. त्या मालिकेनं कोट्यवधी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. सप्टेंबरमध्ये त्याच्या शेवटच्या सीझनमधील पाच भाग प्रदर्शित झाले होते. दोन आठवड्यांपूर्वी त्या सीझनमधील शेवटचे पाच भाग प्रदर्शित झाले आहेत. त्याला नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. प्रोफेसर आणि त्याची टीम अखेर बॅक ऑफ स्पेनमधून पळून जाण्यास यशस्वी होते किंवा नाही याचे उत्तर या भागातून आपल्याला मिळते.

'मनी हाईस्टचा प्रोफेसर' झळकला मुंबई - हैद्राबादच्या भिंतीवर
'मनी हाईस्ट' आवडला? मग, हे चित्रपट आणि शो एकदा पाहाच!
'मनी हाईस्टचा प्रोफेसर' झळकला मुंबई - हैद्राबादच्या भिंतीवर
'मनी हाईस्ट ५'च्या प्रदर्शनाविषयी 'नेटफ्लिक्स'ची महत्त्वपूर्ण माहिती

मनी हाईस्टचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, त्यामुळे अनेक शहरांमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, हैद्रबाद यांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर मुंबई आणि हैद्राबादमधील कित्येक इमारतींवर मनी हाईस्ट फिव्हर दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी देखील जल्दी आओ, जल्दी आओ नावाचा विशेष भाग तयार केला होता. त्या व्हिडिओनं चाहत्यांचे लक्ष वेधले होते. नेटफ्लिक्सच्या वतीनं निर्मिती करण्यात आलेल्या या मालिकेला जगभर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. नेटफ्लिक्सच्या वतीनं प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडीया लढवण्यात आल्या आहेत. मनी हाईस्टमधील पात्रांची शिल्पही यावेळी साकारण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सच्या वतीनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही दिला आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये मनी हाईस्टचा फिव्हर पाहायला मिळाला होता. त्याला तरुणाईची विशेष पसंतीही मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com