esakal | Money Heist 5 पाहण्यासाठी भारतीय कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

money heist 5 seson

Money Heist 5 पाहण्यासाठी भारतीय कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'मनी हाइस्ट' Money Heist 5 या वेब सीरिजचा पाचवा सिझन येत्या ३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिझन दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले पाच एपिसोड येत्या ३ सप्टेंबर रोजी तर नंतरचे पाच एपिसोड्स हे तीन महिन्यांनंतर ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज कोणती, यावर अनेकजण वेगवेगळी नावं सांगतील. मात्र या सगळ्यात मनी हाइस्टची बात काही औरच आहे. या मालिकेनं लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढले. आता या सीरिजचा पाचवा सिझन पाहण्यासाठी जयपूरमधल्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. 'वर्व लॉजिक' या जयपूरमधल्या कंपनीने ३ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. 'मनी हाइस्ट ५' पाहण्यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे.

मनी हाइस्ट या अत्यंत लोकप्रिय वेब सीरिजचा हा शेवटचा सिझन असल्याने कर्मचारी इतर कोणतीही कारणं देऊन सुट्टी घेण्यापेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक जैन यांनी कर्मचाऱ्यांसाठी त्या दिवशी सुट्टी जाहीर केली. 'नेटफ्लिक्स अँड चिल हॉलिडे' अशा नावाची एक नोटीस त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पाठवली. ही नोटीस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'सर्वांत लोकप्रिय प्रोफेसर आणि संपूर्ण कलाकारांना शेवटचं पाहण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन बसा', असं त्या नोटिशीत म्हटलंय.

हेही वाचा: Money Heist: कर्करोगावर मात करणारा अल्वारो खऱ्या आयुष्यातही 'प्रोफेसर'

पही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत असताना अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'कृपया मलासुद्धा त्या कंपनीत नोकरी द्या' अशी विनंती काहींनी केली आहे. तर 'ही ऑफर जबरदस्त आहे' असं म्हणत नेटकऱ्यांनी कंपनीचं कौतुक केलं आहे.

'मनी हाइस्ट ५'चा ट्रेलर प्रदर्शित होताच जगभरातील चाहत्यांनी, प्रेक्षकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. आगळ्यावेगळ्या विषयावरील मांडणी असणा-या मनी हाईस्टनं जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यातील प्रोफेसरची भूमिका करणारा अल्वारो मोर्ते (alvaro morte) हा प्रचंड लोकप्रिय झाला. केवळ परदेशातच नाही तर भारतातही या वेब सीरिजचे अनेक चाहते आहेत. या मालिकेच्या चौथ्या सिझनलाही मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

loading image
go to top