रणबीर-आलियाचं शुभमंगल! 'या' महिन्यात होणार लग्नं...

वृत्तसंस्था
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

हो! रणबीर आणि आलियाने चक्क लग्न करायचं मनावर घेतलंय आणि तेही याच वर्षी!

मधल्या रणबीर कपूर आलिया भट सतत काही ना काही विषयांवरून चर्चेत असतात. मग ते त्यांची लव्हलाईव्ह असेल, त्यांचा एकत्र फोटो असेल नाहीतर त्यांचा येणारा चित्रपट असेल.. त्यांच्या चाहत्यांना या दोघांच्या रिलेशनशिप विषयी प्रचंड उत्सुकता असते. सध्या तर सगळेच लग्न कधी करणार असं म्हणत त्यांच्या मागे लागलेत. पण हा सवाल हे दोघं इतक्या लवकर मनावर घेतील असं वाटलं नव्हतं....

'ब्रह्मास्त्र'ची पहिली झलक (व्हिडीओ)

Image result for alia and ranbir

हो! रणबीर आणि आलियाने चक्क लग्न करायचं मनावर घेतलंय आणि तेही याच वर्षी! यो दोघांचं रिलेशनशिप उत्तम असलं, तरी ते दोघं सध्या तरी करिअरकेड लक्ष देतील असं अनेकांना वाटत होतं, पण जर्नलिस्ट राजीव मसंद यांनी 'ओपन मॅगझिन'साठी घेतलेल्या मुलाखतीत दोघांनी हे गुपित उघड केलंय. डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा दोघांचा विचार असून घरच्यांशीही यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' याच वर्षी ४ डिसेंबरला रिलीज होईल व हे क्यूट कपलही याच दरम्यान विवाहबंधनात अडकेल अशी शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for alia and ranbir

यापूर्वीही रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा पसरत होत्या, आता मात्र त्यांनीच या माहितीला दुजोरा दिल्याने या डिसेंबर हा लग्नसोहळ पार पडेल. कपूर घराण्याच्या वर्षाच्या सुरवातच लग्नाने झाली. रणबीरचा आत्येभाऊ अरमान जैनचा विवाहसोहळा नुकताच पार पडलाय. या विवाहसोहळ्यातही आलिया होणाऱ्या सासूबाई नितू कपूर व रणबीरसोबत दिसली. आलिया कपूर घराण्यातल्या सर्व सण-समारंभांमध्ये दिसते. तर रणबीरही वारंवार आलियाची आई सोनिया राजदान व बहिणीसोबत दिसतो. त्यांच्या लग्नाची तारीख ठरविण्यासाठी कुटुंबामध्येही चर्चा सुरू असल्याचे कळते. 

अमिताभ बच्चन यांनी केले 'ब्रह्मास्त्र'च्या डायरेक्टरला चॅलेंज, म्हणाले आता...

Image result for alia and ranbir

मागील वर्षी रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांनी अमेरिकेत वर्षभर राहून कॅन्सरवरील उपचार करून परतले होते. मात्र मागच्या आठवड्यात त्यांना पुन्हा एकदा त्रास झाला व त्यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. याहीवेळी आलिया 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटींग थांबवून रणबीरसोबत दिल्लीला रवाना झाली होती. अरमानच्या संगीत कार्यक्रमातही हे दोघं डान्स करणार होते, पण ऋषी यांच्या तब्येतीमुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं. अरमानच्या लग्नात ऋषी यांना यायला जमलं नसलं, तरी त्यांचं सर्व कुटूंब या लग्नाला उपस्थित होतं. ऋषी कपूर यांची इच्छा आहे की, रणबीर-आलियाचं लग्न लवकरात लवकर व्हावं यासाठी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली आहे. लग्न भारतात होईल की परदेशात याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

PHOTOS : पूजा सावंतचं या हँडसम अभिनेत्यासोबत जुळलं?

Image result for alia and ranbir

Image result for alia and ranbir

सध्या आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. डिसेंबर २०२०मध्ये 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होईल. तर रणबीरही आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. तसेच ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे सर्वांना त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mark your calendars for #Brahmastra Releasing 04.12.2020

A post shared by Alia (@aliaabhatt) on

पण या वर्षीच्या शेवटी हे कपल लग्नबंधनात अडकणार हे नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: month of Ranbir Kapoor Alia bhat wedding is already decide