'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान'च्या पात्रांचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

सिनेमातील पाच मुख्य पात्रांचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. आमिर खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे मोशन पोस्टर अपलोड केले आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्टारर 'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान' या सिनेमाची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही सिनेमात प्रमुख भुमिका आहेत. सिनेमाचा लोगो व्हिडीओ काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा येत्या दिवाळीत 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील पाच मुख्य पात्रांचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. आमिर खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे मोशन पोस्टर अपलोड केले आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@amitabhbachchan @katrinakaif @fatimasanashaikh @yrf @tohthefilm

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

 

 

 

 

 

 

 

 

सिनेमातून युध्द आणि रणनिती यांचा अनुभव घेता येईल. यशराज या बिग बजेट बॅनरखाली सिनेमा बनला आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 27 सप्टेंबरला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या ट्रेलरचा व्हिडिओ प्रदर्शित होणार असून कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये या तारखेचा खुलासा केला आहे. हा सिनेमा फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे.

 

katrina kaif

 

Web Title: Motion poster released of characters in Thugs of Hindustan Movie