बघा सोनम कपूरच्या 'द झोया फॅक्टर'चे मोशन पोस्टर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

- सोनम कपुरच्या आगामी 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाचा मोशन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

- प्रेक्षकांच्या मनात इंडियाज लकी चार्म बद्दल उतसुक्ता तयार करत प्रदर्शित झालेला मोशन पोस्टर आपल लक्ष वेधुन घेणारा आहे.

सोनम कपुरच्या आगामी 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाचा मोशन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांच्या मनात इंडियाज लकी चार्म बद्दल उतसुक्ता तयार करुन मग प्रदर्शित केलेला, मोशन पोस्टर आपल लक्षवेधी आहे.

या मोशन  पोस्टरमध्ये सोनम कपुर निळ्या रंगाच्या साडीमध्ये आपल्याला दिसत्ये. तिने त्यावर सुरेख दागिने घातले आहेत. तर तिच्या हातात एक बॅट आणि हेडगियर आहे. हा फ्युजन लुक तिच्या पायातील पांढऱ्या स्नीकर्सने पुर्ण केला आहे. चार्मिंग फेस आणि सोनमच दिलखुलास हसु हे या मोशन पास्टरची सुंदरता वाढवत आहेत. चमकदार रंगांमध्ये गुंफलेला हा पोस्टर चित्रपटाची उतसुक्ता पराकोटीला नेतोय.

आता ही झोया सोलंकी 20 सेप्टेंबरला पडद्यावर येणार असुन तिच्या चित्रपटाच्या उतसुक्तेचा किडा तिने सगळ्यांच्या मनात सोडला आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motion poster of Sonam's film The Zoya Factor is out