मौनी रॉयच्या पदरात लग्नानंतर पडलं पहिलं रीजेक्शन; काय झालं?

मोठ्या दिग्दर्शकानं 'हे' कारण सांगून मौनीला सिनेमातनं बाहेर काढल्याची चर्चा.
Mouni Roy
Mouni RoyGoogle

अगदी काहीच महिन्यांपूर्वी बातमी होती की,मौनी रॉय(Mouni Roy),हर्षवर्धन राणे,मीझान जाफरी अशी स्टारकास्ट फूटबॉल खेळावर आधारित एका मोठ्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अर्थातच तो मोठा सिनेमा करणार आहेत संजय गुप्ता. ज्या संजय गुप्ता यांच्या नाववार 'शूटआऊट अॅट वडाला','काबिल','जज्बा' असे अनेक सिनेमे आहेत. पण आता बातमी कानावर येतेय की या स्पोर्ट्स ड्रामात हर्षवर्धन आणि मीझान दिसणार असले तरी 'मिरांडा बॉईज' मध्ये आता मुख्य अभिनेत्री म्हणून मौनी रॉय दिसणार नाही. खबर आहे की,दिग्दर्शकाला मौनी आता त्या सिनेमात नको आहे. म्हणजे ती भूमिका मौनी करेल की नाही याविषयी दिग्दर्शकाला म्हणे खात्री वाटत नाही.

Mouni Roy
कुस्तीपट्टू बबिता फोगाटला झाली कैद; काय आहे प्रकरण..

संजय गुप्ता यांच्या जवळच्याच सूत्रांन इंग्रजी वेबसाईट पिंकव्हिलाला दिलेल्या माहितीनुसार,मौनी रॉय 'मिरांडा बॉईज' मध्ये हर्षवर्धन राणेसोबत दिसणार होती. मौनी रॉयला साईन करण्यात आलं होतं पण आता कळंतय की सिनेमासाठी आता दुसऱ्या एका अभिनेत्रीचा विचार केला जात आहे. मेकर्स तो चेहरा शोधत आहेत म्हणे. अजुन तरी मौनीनं सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली नव्हती,किंवा निर्माते दुसरी कुणी अभिनेत्री तिच्याजागी शोधत आहेत यावर पुढे येऊन तिनं सांगितलं आहे. हा बदल फक्त दिग्दर्शकाला मौनी त्या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही म्हणून केला जात आहे. तसंच, मौनीनं लग्न केल्यामुळे दिग्दर्शकाला आता फ्रेश,तरुण चेहरा,अविवाहित अभिनेत्री तिच्या जागी हवी आहे असंही बोललं जात आहे.

Mouni Roy
'विराटसारखा फलंदाज समोर असेल तर...'; चाहत्याचा अनुष्काला सल्ला

'मिरांडा बॉईज' विषयी बोलायचं झालं हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. फूटबॉल खेळावर आधारित याचं कथानक आहे. हर्षवर्धन आणि मीझान यात फूटबॉल खेळाडूची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. मीझान जाफरी हा सेलिब्रिटी फूटबॉल क्लबचा आधीपासूनच सदस्य आहे,तर हर्षवर्धन सध्या फूटबॉल शिकत आहे. त्यासाठी प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. मार्च महिन्यात पहिल्या पंधरवड्यानंतर या सिनेमाच्या शूटिंगला गोव्यात सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. मौनीनं काही दिवसांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com