नववधू होण्यापूर्वी मौनी रॉयचा हॉट बिकिनी लूक व्हायरल

अभिनेत्री या महिन्यात २७ तारखेला गोव्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आहे.
Mouni Roy
Mouni RoyGoogle

मौनी रॉय(Mouni Roy) ही जशी आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असते तशीच ती सोशल मीडियावरील आपल्या अनेक फोटो तसंच व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातूनही चर्चेत असते. आता मौनी रॉयचे फोटो म्हटले की ते बोल्ड आणि हॉट असणारंच. म्हणजे काय इंटरनेटचा पारा चढायलाच हवा नाही का. तसं पहायला गेलं तर अक्षय कुमार पासून राजकुमार राव पर्यंत मोठमोठ्या कलाकारांसोबत मौनीनं काम केलंय. टी.व्ही इंडस्ट्रीपासून सुरू झालेला तिचा प्रवास बॉलिवूडमध्ये मात्र बऱ्यापैकी स्थिरावला. तिला यश बऱ्यापैकी मिळालं असं नक्कीच मान्य करायला हवं. असो,तर अशी ही मौनी रॉय आता लग्न करणार आहे. म्हणूनच की काय लग्नाच्या आधी तिनं बिकिनी घालून बोल्ड अंदाजात फोटो शूट केल्याचं दिसून येतंय.

मौनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यलो कलरच्या बिकिनीतले हॉट फोटो शेअर केले आहेत. जे काहीच वेळात वेगानं व्हायरल झाले. यातनं मौनीची टोन्ड हॉट फिगर फ्लॉन्ट झाली आहे. फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊसही पडला. तर अशा या आपल्या होणाऱ्या नववधूच्या बोल्ड फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवलीय. मौनी येत्या २७ तारखेला दुबईतील बिझनेसमन सुरज नांबियारशी लग्नबंधनात अडकणार आहे. सुरुवातीला ती दुबईत लग्न करणार अशी बातमी होती. पण आता सुत्रांच्या माहितीनुसार कन्फर्म कळालंय की अभिनेत्री गोव्यात लग्न करणार आहे. त्यासाठी गोव्यातील एक फाईव्ह स्टार रीसॉर्ट बूक करण्यात आलय. मौनी रॉय 'ब्रम्हास्त्र' सिनेमात आता आपल्याला दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com