esakal | मौनी राॅय थिरकली या गाण्यावर आणि चाहते झाले बेहद्द खुश...
sakal

बोलून बातमी शोधा

mouni  roy

क्योंकी सांस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे अभिनेत्री मौनी राॅयने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले. त्यानंतर तिने काही मालिकांमध्ये काम केले. परंतु तिला अधिक लोकप्रियता मिळाली

मौनी राॅय थिरकली या गाण्यावर आणि चाहते झाले बेहद्द खुश...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्योंकी सांस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे अभिनेत्री मौनी राॅयने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले. त्यानंतर तिने काही मालिकांमध्ये काम केले. परंतु तिला अधिक लोकप्रियता मिळाली ती नागीन या मालिकेमुळे. छोट्या पडद्यावर काम करीत असतानाच मोठ्या पडद्यावरही तिने काम केले. अक्षय कुमारबरोबर गोल्ड या चित्रपटातही तिने काम केले आङे.

धक्कादायक! मुंबईत क्वांरटाईन सेंटरमध्ये मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न

एकीकडे छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर काम करीत असतानाच ती सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. आपले योगा तसेच व्यायामाचे विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करीत असते.

आपल्या फिटनेसचे रहस्य नेमके काय आहे हेदेखील सांगत असते. आता तिने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तिच्या चाहत्यांनी त्याला
चांगलीच दाद दिली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राॅयने निम्बुडा निम्बुडा या गाण्यावर धमाल नृत्य केले होते आणि ते गाणे चांगलेच लोकप्रिय ठरले होते. आता याच गाण्यावर मौनी थरकली आहे आणि तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे.

कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगल्या कमेंटस दिल्या आहेतच शिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी तिचे कौतुक केले आहे. 

mouny roy did dance on this song fans are happy