चित्रीकरण म्हणजे पिकनिक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

अभिनेत्री जुही चावला व अभिनेता आमीर खान यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट म्हणजे "कयामत से कयामत तक'. हा आमीरचा पहिलाच चित्रपट आणि या चित्रपटाच्या पूर्वी जुहीने दोन चित्रपटात काम केलेले होते.

या चित्रपटापूर्वी आमीरने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेले होते. पण "कयामत से कयामत तक'च्या वेळी कॅमेरासमोर तो नवा होता. त्यामुळे चित्रीकरणावेळी त्याला बरेच रिटेक घ्यावे लागले होते. दुसरीकडे जुही आपले सीन सहजतेने करत होती.

"कयामत से कयामत तक' चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा जुहीने सांगितला की, आमीरच्या आधी एकदम सहजतेने माझ्या सगळ्या दृश्‍यांचे चित्रीकरण पार पडायचे तेव्हा मला खूप मजा यायची. मला वाटायचे की मी चांगले काम करीत आहे. कारण आमीर एक सीन पूर्ण करण्यासाठी बरेच रिटेक घ्यायचा. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मला पिकनिकला आल्यासारखे वाटायचे. 

Web Title: movie shooting like a picnic