
परमार यांनी सांगितले की, त्यांची पत्नीही एमपी पोलीसमध्ये कार्यरत आहे. मात्र लग्नानंतर ते दोघेही वेगवेगळ्या शहरात राहत होते.
मुंबई - कौन बनेगा करोडपती गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला कार्यक्रम आहे. आता या शो मधून अमिताभ क्विट होणार आहेत असे त्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. मी आता थकलो आहे, मला विश्रांती घ्यायची आहे असे त्यांनी सांगितले होते. कदाचित कौन बनेगा करोडपतीच्या यापुढील पर्वात बिग बी दिसणार नाहीत असे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी केबीसीच्या एका भागात अमिताभ यांच्या दर्यादिलीचा प्रत्यय एका जोडप्याला आला. अमिताभ यांनी त्यांच्या ट्रान्सफरसाठी मध्यप्रदेश सरकारला शब्द टाकला आणि त्या जोडप्याची बदली झाली. त्यांनी त्यासाठी अमिताभ यांचे आभार मानले आहेत. विवेक परमार आणि त्यांची पत्नी प्रिती सिकरवार हे दोघेजण मध्यप्रदेश पोलीस मध्ये कार्यरत आहेत. अमिताभ ज्यावेळी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे होस्ट म्हणून अमिताभ सुत्रे हाती घेतात तेव्हा त्या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धेक त्यांच्याशी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्यांच्याशी शेयर करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी केबीसीमध्ये एमपीतील मंदसोर मधील पोलीस कॉस्टेंबल विवेक परमार हॉट सीटवर बसले होते.
परमार यांनी सांगितले की, त्यांची पत्नीही एमपी पोलीसमध्ये कार्यरत आहे. मात्र लग्नानंतर ते दोघेही वेगवेगळया शहरात राहत होते.विवेक यांच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यानंतर महानायक अमिताभ यांनी मध्य प्रदेश सरकार आणि पोलीस यांना एक विनंती केली होती की त्या दोन्ही पती पत्नीला एकाच ठिकाणी पोस्टिंग द्यावी. बिग बी यांच्या विनंतीला मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद दिला. परमार यांनी 25 लाख रुपये जिंकले होते. त्य़ावेळी अमिताभ यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले, मंदसोर ते ग्वालियर हे अंतर 400 किमी आहे. तिथे त्यांची पत्नी काम करते. त्यामुळे त्य़ांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यावर अमिताभ यांनी मध्यप्रदेश सरकार आणि पोलिसांना मदतीसाठी आवाहन केले होते.
अमिताभ म्हणाले, परमार यांच्यासारखी परिस्थिती असलेले जेवढे लोक आहेत त्यांना एका ठिकाणी पोस्टिंग दिल्यास बरे होईल. यात काय नुकसान होणार नाही. त्यानंतर मंगळवारी विवेक परमार यांची पत्नी प्रिती सिकरवार यांना मंदसोरला पोस्टिंगची ऑर्डर मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता प्रिती यांची मंदसोर येथील नारकोटिक्स विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.