“मिस्टर बीन यापुढे दिसणार नाही”; रोवन एटकिन्सन झाले भावनाशील 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

65 वर्षीय रोवन सध्या मिस्टर बीनच्या अॅनिमेटेड चित्रपटासाठी काम करत आहेत.‘मीस्टर बीन’ ही रोवन यांची सर्वाधिक गाजलेली व्यक्तिरखा आहे.

मुंबई - मनोरंजनाच्या क्षेत्रात अशा काही अजरामर व्यक्तिरेखा तयार झाल्या की त्याचा प्रभाव अजूनही जनमाणसांवर टिकून आहे. त्या व्यक्तिरेखांची छाप प्रेक्षकांच्या मनावर एवढी घट्टपणं उमटली आहे की त्या नॉस्टेलजियात रमायला सगळ्यांना आवडते. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ ज्या प्रेक्षकांना प्रचंड हसवलं, त्याचं मनोरंजन केलं अशा मिस्टर बीनला कायमचा निरोप देण्यात येणार आहे. अशी माहिती दस्तुरखुद्द या पात्राचे निर्माते रोवन एटकिन्सन यांनीच दिली आहे. हे सर्व काही सांगताना ते कमालीचे भावनाशील झाले होते. 

काय अदभुत जादु होती त्या मिस्टर बीन नावाच्या पात्रामध्ये, तो काहीही करायचा, वरवर साधा भोळा, गरीब, बिचारा दिसणारा हा बिन कमालीचा खोडकर होता. कधीही, कुठेही आणि केव्हाही लोकांची फिरकी घ्यायची, त्यांना सळो की पळो करुन सोडायचे, शेवटी आपण काही केलेच नाही असा आव आणायचा यासाठी मिस्टर बिन फार लोकप्रिय होता. त्यामुळे जगाच्या पाठीवर खूप लोकप्रियता मिळाली. लोकांनी त्याच्यावर फार प्रेम केले. त्याला डोक्यावर घेतले. केवळ इंग्लिश प्रेक्षकांपुरती त्याचे मनोरंजन नव्हते. त्यापलीकडे जाऊन त्यानं सर्वांना आपल्या कलेनं समृध्द केलं. त्यांना निखळ आनंद दिला.

Mr Bean on the Town! | Full Episodes | Classic Mr Bean - YouTube

तुम्हाला माहिती असेल की, लेखक आणि निर्माता रोवन एटकिन्सन यांनी मिस्टर बिन हे टोपण नाव धारण केले होते. त्यांना खऱ्या नावापेक्षा मिस्टर बीन या टोपण नावानेच आज जर ओळखते.  त्यांची सर्वाधिक गाजलेली ही व्यक्तीरेखा आहे. असा हा बिन यापुढे दिसणार असल्याचे अटकिन्सन यांनी एका मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले,  मिस्टर बीन साकारण्यात आता मला मजा येत नाही. ती व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी मला आनंद, समाधान देत नाही. मला ती व्यक्तीरेखा आता अधिक तणावाची आणि थकवणारी वाटते. आता त्या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देण्याचा मी विचार करत आहे”,  हे त्यांनी ‘रेडिओ टाइम्स’शी बोलताना सांगितले.

ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांनी मिस्टर बीन ही व्यक्तीरेखा तयार केली आणि 1990 मध्ये टेलिव्हिजनवर या व्यक्तीरेखेचं पदार्पण झालं. 1978 मध्ये ‘बीबीसी रेडिओ 3’ या वाहिनीवर अॅटकिन्सन यांची ‘द एटकिन्सन पिपल’ ही विनोदी कार्यक्रमाची मालिका विशेष गाजली होती. एटकिन्सन आणि रिचर्ड कर्टिस यांनी या मालिकेचे लेखन केले होते.

 हे ही वाचा: साऊथ सुपरस्टार विजयच्या 'विजय द मास्टर' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, पाहा पहिली झलक  

65 वर्षीय रोवन सध्या मिस्टर बीनच्या अॅनिमेटेड चित्रपटासाठी काम करत आहेत.‘मीस्टर बीन’ ही रोवन यांची सर्वाधिक गाजलेली व्यक्तिरखा आहे. मात्र त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अशा अनेक विनोदी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. रोवन यांनी अभिनय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिजमध्ये काम केले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mr bean said that it is stress and exhausting to look forward the end of it reaction of rowan atkinson