मिसेस खिलाडीच ती... 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

एका इंग्रजी दैनिकात"मिस फनी बोन' कॉलम आपल्या बिनधास्त अंदाजात लिहिणारी ट्विंकल खन्ना अर्थातच मिसेस खिलाडी सध्या चांगलीच अडचणीत आली आहे. तिने चक्क सुलतान अर्थात सलमान खानवर कमेंट करून त्याच्या फॅन्सशीच पंगा घेतलाय. इंटेरिअर, पर्यावरण अन बाग-बगिचाविषयी सल्ले देता देता मॅडम आता विवाहेच्छुकांनाही फुकटचे सल्ले देऊन बसली नि गोत्यात आली. त्याचं झालं असं की, मॅडमने आपल्या कॉलममध्ये सलमानची डिटेल माहिती दिली.

फॅन्सना संपर्कासाठी"सुलतान @ भाईजान.कॉम'चा पत्ताच देऊन टाकला. बरं, माहितीत तिने मुलगी कमी बडबडणारी हवी असं सांगत मुलाला बकबक आवडत नसल्याचंही जाहीर केलं. ट्विंकलच्या कमेंटने सुलतानचे फॅन्स चांगलेच भडकले. त्यांनी  धडाधड तिच्या कॉलमखाली कमेंट देऊन नाराजीही व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता "मिस्टर खिलाडी' अर्थात अक्षय कुमारचे चित्रपट बॅन करण्याची धमकीही दिली.

काही  फॅन्सने तर ति ला स्वतःच्या नवऱ्याचं कॅरेक्‍टर तपासून पाहण्याचा आगाऊ सल्लाही दिला... अशा तिखट कमेंट्‌स ऐकून गप्प बसेल ती ट्विंकल कसली... तिनेही फॅन्सला न  घाबरला ट्विट केलं..."पॉलिटिक्‍स अन्‌ सोशल कमेंट करते. मुंगीची परीक्षा करायची नि हत्ती समूहाने येतो, म्हणून त्याला सोडून द्यायचे, असा प्रकार मी करत नाही,' असे  ठणकावून तिने थेट सल्लूच्या फॅन्सशी पंगा घेतला की राव! 
 
Web Title: MRS Khiladi