मृणालने नाकारली आमीरची आॅफर

सोमवार, 25 सप्टेंबर 2017

अभिनेत्री मृणाल ठाकूरने स्वकर्तृत्वाने आपलं करिअर घडवलं आहे. कुमकुम भाग्य या मालिकेपासून तिने केलेली सुरूवात आता हाॅलिवूडपटापर्यंत आला आहे. आता तिचा लव्ह सोनिया हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिचं या सिनेमातलं काम बघून आमीर खानने तिला ठग्ज आॅफ हिंदुस्थानमध्ये आॅफर दिली होती. पण तिने मात्र अत्यंत नम्रपणे ही आॅफर नाकारली आहे. 

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने स्वकर्तृत्वाने आपलं करिअर घडवलं आहे. कुमकुम भाग्य या मालिकेपासून तिने केलेली सुरूवात आता हाॅलिवूडपटापर्यंत आला आहे. आता तिचा लव्ह सोनिया हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिचं या सिनेमातलं काम बघून आमीर खानने तिला ठग्ज आॅफ हिंदुस्थानमध्ये आॅफर दिली होती. पण तिने मात्र अत्यंत नम्रपणे ही आॅफर नाकारली आहे. 

आमीर खानसोबत आदित्य चोप्रा यांनाही मृणालचं काम खूप आवडलं होतं. खरंतर या पूर्वी सुलतान या चित्रपटासाठी मृणालने आॅडिशनही दिली होती. त्यातलं तिचं काम बघून आदित्य चोप्रा आवाक झाले होते. इतकंच नाही, तर अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, परिणिती चोप्राप्रमाणे तिलाही लाॅंच करण्याचा त्यांचा मानस असल्याचं समजतं. पण त्यांच्यासोबत सलग तीन चित्रपटांसाठी करार असल्यामुळे मृणालने ही आॅफर नाकारल्याचे कळतं. सध्या तिचा लव्ह सोनिया हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून तिला आता हाॅलिवूड खुणावत असल्याच्या चर्चा आहेत.

त्यावेळी आमीर खानने दिलेली आॅफर नाकारून मृणालने चूक केली आहे, असंही काही लोक म्हणू लागले आहेत. अर्थात मृणालच करिअर उत्तम आहेच. म्हणूनच तिला आमीरपासून सगळ्यांच्या आॅफर्स येत असाव्यात. 

Web Title: mrunal thakur offers new films esakal news