
Maharashtra Shaheer सिनेमात दिसणार लता मंगेशकर, हि लोकप्रिय अभिनेत्री साकारणार भूमिका
Maharashtra Shaheer News: केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा धमाकेदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाच.
शिवाय काहीच दिवसांपूर्वी सिनेमातलं बहरला हा मधुमास हे पहिलं गाणं सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलं.
(the role of Lata Mangeshkar in Maharashtra Shaheer movie)
महाराष्ट्र शाहीर बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. सिनेमात लता मंगेशकरांची भूमिकाही असणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिकेत मराठीतली एक आघाडीची अभिनेत्री दिसणार आहे. ती म्हणजे मृण्मयी देशपांडे.
सध्या तरी याविषयी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. मृण्मयीला लतादीदींच्या भूमिकेत पाहायला तिचे फॅन्स उत्सुक आहेत.
मृण्मयी देशपांडे सिनेमात काम करण्यास उत्सुक आहे. यानिमिताने मृण्मयी अनेक महिन्यांनी मराठी सिनेमात झळकणार आहे.
काहीच दिवसांपुर्वी सिनेमातील पहिलं रोमँटिक गाणं 'बहरला हा मधुमास' प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड वर आहे.
नुकताच या गाण्यावर तीन जिगरी दोस्तांनी डान्स केलाय. ते म्हणजे अंकुश चौधरी - भरत जाधव आणि केदार शिंदे. अंकुश - भरत - केदार या तिघांची मैत्री मराठी इंडस्ट्रीत कायम चर्चेचा विषय राहिला आहे.
महाराष्ट्र शाहीर निमित्ताने अंकुश - भरत - केदार अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हे तिघे एकत्र आले म्हणजे धम्माल तर होणारच.
अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.
जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेली लोकप्रिय गाणी सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.