Salman Khan: अत्यंत साधेपणानं 1 BHK घरात राहतो भाईजान जवळच्या व्यक्तीनं केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

Salman Khan: अत्यंत साधेपणानं 1 BHK घरात राहतो भाईजान जवळच्या व्यक्तीनं केला खुलासा

सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. दबंग खानने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर सुपरस्टार असूनही सलमान खानला अतिशय साधे जीवन जगणे आवडते.

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनीही सलमान खान बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक असूनही साधी राहणीमान आहे असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

मुकेशने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. मुकेशने सलमानचं तोंडभरून या पॉडकास्टमध्ये कौतुक केलं आहे. तो म्हणाला, सलमान ही अशी एकमेव व्यक्ती आहे जी प्रत्येकाच्या मदतीला धावून येते. “तो खूप प्रामाणिक आहे आणि लोक त्याच्या याच प्रामाणिकपणाचा गैरसमज करून घेतात. पुढे ते म्हणाले, हीच समस्या आहे की जेव्हा तुम्ही काही प्रामाणिकपणे म्हणता, तेव्हा लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात”.

“सलमानला तुम्ही जर मध्यरात्री 3 वाजता कॉल केला, तरी तो तुमचा फोन उचलेल. प्रत्येकाला एवढ प्रेम मिळत नाही. अशा प्रेमासाठी देवाने खास व्यक्ती निवडलेली असते आणि सलमान खान त्यापैकीच एक आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत.. प्रत्येकजण सलमानवर प्रेमाचा वर्षाव करतो”, अशा शब्दांत मुकेशने सलमानचे कौतुक केले आहे. सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्युबलाइट’ या चित्रपटांसाठी मुकेशने कास्टिंग निवडली होती.

सलमानच्या साध्या राहणीने दिग्दर्शकही थक्क झाले आहेत. सलमानच्या लाइफस्टाइलविषयी तो म्हणाला, "बर्‍याच कमी लोकांना माहित आहे की, सलमान खान जिथे राहतो ती जागा 1BHK अपार्टमेंट आहे. त्यात एक सोफा, डायनिंग टेबल, एक छोटी जागा आहे जिथे तो लोकांशी बोलतो. एक छोटी जिम आणि एक खोली आहे.

सलमान खान जगातील सर्वात मोठा स्टार आहे." तो अतिशय साधे जीवन जगतो. त्याला फॅन्सी ब्रँड आवडत नाहीत. तो सर्व काही खातो, तो सामान्य जीवन जगतो. ही त्याची कलात्मक प्रक्रिया नाही. तो तसाच आहे." मुकेश म्हणाले की तो 15 वर्षांपासून त्याच्याशी संवाद साधत आहे आणि तो कधीही बदलला नाही.

सलमान अखेरचा शाहरुख खानच्या 'पठाण' या अॅक्शन चित्रपटात कॅमिओमध्ये दिसला होता. तो लवकरच फरहाद सामजीच्या 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहे. KKBKKJ 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. टायगर 3 यावर्षी 10 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.