'कट्टर झाला अ‍ॅक्टर'! शक्तिमाननं नसिरुद्धीन शहांच्या कानातून काढला जाळ| Mukesh Khanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Khanna Angry on Naseeruddin Shah Actor

Mukesh Khanna : 'कट्टर झाला अ‍ॅक्टर'! शक्तिमाननं नसिरुद्धीन शहांच्या कानातून काढला जाळ

Mukesh Khanna Angry on Naseeruddin Shah Actor Reaction : 'कट्टर झाला अॅक्टर'! शक्तिमाननं नसिरुद्धीन शहांच्या कानातून काढला जाळ 'कट्टर झाला अॅक्टर'! शक्तिमाननं नसिरुद्धीन शहांच्या कानातून काढला जाळ बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताज या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. त्याच्या निमित्तानं शाह यांनी ज्याप्रकारे मुलाखती दिल्या त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले.

आता प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी शाह यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.त्यांनी शाह यांना चांगलेच सुनावले आहे. ते म्हणतात, शाह यांना या देशामध्ये कुणीच सुरक्षित वाटत नाही. ते नेहमीच वेगळ्या प्रकारची वक्तव्यं करुन लक्ष वेधून घेताना दिसतात. दरवेळी काहीही बोलून लक्ष वेधून घेणे त्यांना चांगले जमते. त्यांना जर असे वाटते की, कुणीही सुरक्षित नाही तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता शंभर कोटी हिंदू सुरक्षित नाही हे सांगावे लागेल.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

एकदा का तुमच्यामध्ये कट्टरता आली की मग तुम्ही काहीही बोलू लागता. तुम्हाला अशाप्रकारे बोलणे आणि वागणे शोभत नाही. एवढं वाटतं तर मग लव जिहादच्या यात्रेत सहभागी व्हा. आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे शाह यांनी करावा. अशा शब्दांत खन्ना यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही नेहमीच जर अशा प्रकारचे वक्तव्य केल्यास लोकं तुमचे चित्रपट पाहणे बंद करतील. हे सांगावेसे वाटते.

शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी नसिरुद्दीन शहा यांना चांगलेच झापले आहे. आपण काय बोलतो याचा विचार त्यांनी करावा. त्यांच्या बोलण्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही का, शाह यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की, मुस्लिमांना टार्गेट करणे ही आता एक प्रकारची फॅशन झाली आहे. यानंतर मुकेश खन्ना यांनी त्यांच्या भीष्म इंटरनॅशनल या युट्यूब चॅनेलवरुन शाह यांच्यावर कडाडून टीका केली आहे.