सुबोध-मुक्ता नऊ वर्षांनी एकत्र 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

'एक डाव धोबीपछाड' चित्रपटानंतर सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे "हृदयांतर' चित्रपटासाठी तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकत्र आलेत. दोघे पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. विक्रम फडणीस प्रॉडक्‍शन आणि "यंग बेरी एंटरटेन्मेंट' बॅनरखाली बनत असलेला "हृदयांतर' 9 जूनला प्रदर्शित होतोय.

विक्रम फडणीस, प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुबोध-मुक्‍ताबरोबरच सोनाली खरेही त्यात आहे. जोशी कुटुंबाच्या कथेमध्ये समायरा जोशीच्या भूमिकेत मुक्ता आहे. तिच्या पतीची अर्थात, शेखर जोशीची भूमिका सुबोध करतोय. चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे, हृतिक रोशनही त्यात एका विशेष भूमिकेत आहे.

सुबोध म्हणतो, "मुक्ता आणि मी पुण्यातले. कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेपासून आमची मैत्री आहे. मुंबईत आल्यानंतर आम्ही "बंधन' मालिका केली होती. त्यानंतर "एक डाव धोबीपछाड' चित्रपट केला. तिच्या कामाबद्दल मला अतिशय आदर आहे. तिच्याबरोबर काम करताना मी नेहमीच रिलॅक्‍स असतो.' मुक्ताने सांगितले की, कॉलेजमध्ये असतानाच ज्याच्याशी एकदा तरी बोलावंसं वाटावे, असा लाखो तरुणींच्या दिलाची धडकन असलेला हॅण्डसम हंक सुबोध ते माझा जीवलग मित्र सुब्या,असा आमच्या मैत्रीचा प्रवास झालाय. सुरुवातीच्या काळात सुबोधने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे मी कॉश्‍च्युम्सही केले होते. "हृदयांतर' आमच्यासाठी नक्कीच एक अविस्मरणीय सिनेमा असेल.  

Web Title: mukta barve and subodh-bhave come together after 9 year in hrudyantar movie