'मुळशी पॅटर्न' फेम प्रवीण तरडेंचा येणार 'सरसेनापती हंबीरराव'

टीम ई-सकाळ
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हेलिकॉप्टरमधून गड किल्ल्यांचे दर्शन घेत 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाची घोषणा केली. त्यांच्या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले. मराठ्यांचे शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे, असे तरडे म्हणाले.

मुंबई : लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हेलिकॉप्टरमधून गड किल्ल्यांचे दर्शन घेत 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाची घोषणा केली. त्यांच्या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले. मराठ्यांचे शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे, असे तरडे म्हणाले.

'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटानंतर आता उर्विता प्रॉडक्शन निर्मित 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. याबाबत प्रविण तरडे म्हणाले, 'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाच्या यशानंतर जबाबदारी वाढली आहे. राजगड आणि तोरणा गडावर आम्ही गेलो. त्यानंतर 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाची घोषणा केली. मराठ्यांचे शौर्य या माध्यमातून दिसणार आहे. मराठ्यांचे आक्रमक वेगळे रुप आता पाहायला मिळणार आहे. 

तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून लढणारा मराठा दिसणार आहे. मीही या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक म्हणून नाहीतर माझी तयारी म्हणून मला भूमिका मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mulshi Pattern fame Pravin Tardes New Film Sarsenapati Hambirrao Release Soon