esakal | अखेर PVR कडून हिरवा कंदील; कंगनाचा 'थलायवी' थिएटरमध्ये करणार प्रदर्शित
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut film thalaivi release remains unchanged attacks karan johar aditya chopra bollywood ke thekedaars

अखेर PVR कडून हिरवा कंदील; कंगनाचा 'थलायवी' थिएटरमध्ये करणार प्रदर्शित

sakal_logo
By
स्वाती वेमूल

येत्या १० सप्टेंबर रोजी अभिनेत्री कंगना रणौतचा Kangana Ranaut 'थलायवी' Thalaivi हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषेत मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यास अखेर पीव्हीआरने PVR होकार दिला. कंगनाने सोशल मीडियाद्वारे मल्टिप्लेक्सवर टीका केली होती. तिच्या पोस्टनंतर पीव्हीआरने हा निर्णय घेतला. कंगनाचा चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यास आधी नकार देण्यात आला होता.

काय होती कंगनाची पोस्ट?

'जेव्हा मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा मल्टिप्लेक्सचे नियम वेगळे असतात. त्यांनी राधे हा चित्रपट ओटीटी आणि चित्रपटगृहात एकाच वेळी प्रदर्शित होऊ दिला होता. हॉलिवूड चित्रपटसुद्धा ते प्रदर्शित करू देत आहेत. मात्र माझ्या थलायवी चित्रपटाला ते नकार देत आहेत. एकीकडे हेच महिलांचे पाय खेचतात आणि दुसरीकडे अभिनेत्यांच्या तुलनेत सक्षम भूमिका असलेल्या अभिनेत्रींच्या चित्रपटाला फारसे प्रेक्षक मिळत नसल्याची तक्रार करतात', अशी पोस्ट कंगनाने लिहिली होती.

हेही वाचा: "गोविंदा मामा असेल तर मी काम नाही करणार"; कृष्णा अभिषेकचा साफ नकार

कंगनाने त्यानंतर आणखी एका पोस्टमध्ये स्पष्ट केलं, थलायवीच्या दाक्षिणात्य भाषांमधील चित्रपटांना थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यास एका मल्टिप्लेक्स चेनने होकार दिला आहे. यासाठी कंगनाने पीव्हीआरचे आभार मानले आहेत. 'थलायवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये कंगना जयललिता यांची भूमिका साकारत आहे.

loading image
go to top