'मुंबई-पुणे-मुंबई 3'चा टीझर प्रदर्शित; बघा या प्रवासाची तीन वर्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पहिल्या भागात या दोघांची भेट आणि पुणे-मुंबईचा वाद दाखवण्यात आला होतं. दुसऱ्या भागात प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या लग्नाची गोष्ट आपण बघितली. आता तिसऱ्या भागात नेमकं काय असणार आहे. याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये असेलच.

मुंबई - पुण्यात कोण श्रेष्ठ हा वाद तसा जुनाच. पण एक जोडपं आहे ज्यांनी या वादाला हसतखेळत जगत आपला गोड संसार थाटला आहे. हे रुपेरी पडद्यावरचं जोडपं म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे. 'मुंबई-पुणे-मुंबई' या सुपरहिट सिनेमानंतर ही जोडी 'मुंबई-पुणे-मुंबई 2' हा सिनेमा घेऊन आली. आता पुन्हा एकदा 'मुंबई-पुणे-मुंबई 3' या सिनेमातून ही जोडी आपल्या भेटीला येणार आहे.  

पहिल्या भागात या दोघांची भेट आणि पुणे-मुंबईचा वाद दाखवण्यात आला होतं. दुसऱ्या भागात प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या लग्नाची गोष्ट आपण बघितली. आता तिसऱ्या भागात नेमकं काय असणार आहे. याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये असेलच.

तर 'मुंबई-पुणे-मुंबई 3' चा टीझर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात गौरी (मुक्ता बर्वे) आणि गौतम (स्वप्नील जोशी) यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर ते आले आहेत. या टप्प्यावरच्या त्यांच्या प्रवासाची गोष्ट सिनेमात उलगडणार आहे. पण तुर्तास या जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल लागली असल्याचे टीझरवरुन कळते. 

सिनेमाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई 3' हा चित्रपट 7 डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Pune Mumbai Part Three Teaser Released