चर्चा भाईजानच्या गिफ्टची... 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन... द मोस्ट एलिजेबल बॅचलर अर्थात बॉलीवूडचा दबंग खान सल्लूमियॉं चर्चेत नसेल तरच नवल. 27 डिसेंबरला त्याचा बर्थ डे होता. पनवेलमधील आपल्या फार्महाऊसमध्ये त्याच्या 51व्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशनही झालं. लाडकी बहीण अर्पिता अन्‌ तिच्या बडीने भाईजानसाठी"बिईंग ह्युमन' लेटरिंग असलेला खास केकही बनवून घेतला. मग काय, भाचा अखिल आणि आई सलमा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाईजानच्या बर्थ डेचं जमके सेलिब्रेशन झालं. अर्थातच, वाढदिवस सलमानचा असल्याने पाहुण्यांची यादीही मोठी होती.

लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन... द मोस्ट एलिजेबल बॅचलर अर्थात बॉलीवूडचा दबंग खान सल्लूमियॉं चर्चेत नसेल तरच नवल. 27 डिसेंबरला त्याचा बर्थ डे होता. पनवेलमधील आपल्या फार्महाऊसमध्ये त्याच्या 51व्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशनही झालं. लाडकी बहीण अर्पिता अन्‌ तिच्या बडीने भाईजानसाठी"बिईंग ह्युमन' लेटरिंग असलेला खास केकही बनवून घेतला. मग काय, भाचा अखिल आणि आई सलमा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाईजानच्या बर्थ डेचं जमके सेलिब्रेशन झालं. अर्थातच, वाढदिवस सलमानचा असल्याने पाहुण्यांची यादीही मोठी होती. फॅमिली मेंबर्ससह चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि टीव्ही इंडस्ट्रीतील त्याच्या सर्व मित्रांनीही आवर्जून उपस्थित राहून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. साजिद नाडियादवाला, बोनी कपूर, अनिस बज्मी, कबीर कपूर, सुशांत सिंग राजपूत, मिनी माथूर अन्‌ रेमो डिसूझासह इतर सेलिब्रिटीजही त्याच्या आनंदात सहभागी झाले. ब्लॅकब्युटी बिपाशा बासूने पती करण सिंग ग्रोवरसह पार्टीत धमालमस्ती केली. सल्लूची पार्टी गाजली ती रिटर्न गिफ्टमुळे. पार्टीला चारचॉंद लावलेल्या कलाकारांना"दरिया दिल' भाईजान रिकाम्या हाताने पाठवलं नाही. सर्वांना चक्क एक गोल्डन चेन रिटर्न गिफ्ट दिली. तीही छानशा पेंड्‌टने सजलेली... इथेही त्याने आपली स्टाईल मेंटेन केली. सल्लूच्या रिटर्न गिफ्टची चर्चा बी-टाऊनमध्ये एवढी रंगली की, आता सगळेच त्याच्या नव्या पार्टीची वाट पाहताहेत म्हणे! 
 

Web Title: Mumbai: Salman Khan and Sajid Nadiadwala spotted outside a restaurant