बर्थडे स्पेशलः  मुमताजच्या लग्नाची बातमी ऐकून राजेश खन्ना झाले होते नाराज

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शुक्रवार, 31 जुलै 2020

३१ जुलै १९४७ रोजी मुमताजचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. मुमताजने तिचे टपोरे डोळे, गोरा रंग आणि अभिनयाच्या अनोख्या अंदाजाने सगळ्यांवर जादू केली होती.

मुंबई- ६० आणि ७० च्या दशकात मुमताजची गिनती सुपरहिट अभिनेत्रींमध्ये व्हायची. ३१ जुलै १९४७ रोजी मुमताजचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. मुमताजने तिचे टपोरे डोळे, गोरा रंग आणि अभिनयाच्या अनोख्या अंदाजाने सगळ्यांवर जादू केली होती. तिच्या लाजणा-या अदा, चुलबुला आणि खोडकर अंदाजसोबत जेव्हाही मुमताज पडद्यावर यायची तेव्हा प्रेक्षक तिच्यासाठी वेडे व्हायचे.

हे ही वाचा: सुशांतच्या सीएचा दावा- १५ कोटींचा व्यवहार अकाऊंटमधून झाला नाही'

मुमताजने वयाच्या केवळ १२ व्या वर्षात तिच्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला तिला सहकलाकाराच्या भूमिका दिल्या जायच्या मात्र तिचं स्वप्न हिरोईन बनण्याचं होतं. मुमताजने दारा सिंहसोबत १६ सिनेमे केले. या १६ सिनेमांपैकी १० सिनेमे जबरदस्त हिट झाले. यानंतर तिला सिनेइंडस्ट्रीत ओळखलं जाऊ लागलं.

मुमताजची जोडी सगळ्यात जास्त हिट झाली ती राजेश खन्नासोबत. काका आणि मुमताज यांचं एकत्र पडद्यावर दिसणं म्हणजे सिनेमा हिट होणार असं गणित मांडलं जायचं. या जोडीने 'दो रास्ते', 'सच्चा-झुठा', 'आपकी कसम', 'अपना देश', 'प्रेम कहानी', 'दुश्मन', 'बंधन' आणि 'रोटी' सारख्या यशस्वी सिनेमांमध्ये काम केलं. एवढंच नाही तर दोघांवर चित्रीत झालेली गाणी सुद्धा हिट व्हायची. 

Bollywood Throwback: इस एक्ट्रेस संग खूब जमती ...

१९७४ मध्ये जेव्हा मुमताजने मयूर मधवानींशी लग्न केलं तेव्हा राजेश खन्ना यांचं मन नाराज झालं. मुमताजने आत्ता लग्न करावं असं राजेश खन्ना यांना वाटत नव्हतं. एकेकाळी लोकांच्या मनावर राज करणा-या मुमताजच्या आयुष्यात अशी वेळ आली की तिला कॅन्सरने ग्रासलं. मात्र ती कॅन्सरशी लढली आणि त्यावर मात देखील केली.

मुमताजने त्यांच्या करिअरमध्ये जवळपास १०९ सिनेमांमध्ये काम केलं. १९७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक असलेल्या मुमताजने 'मेला', 'अपराध', 'नागिन', 'ब्रह्मचारी', 'राम और श्याम', 'दो रास्ते', 'खिलौना' सारख्या सिनेमातून तिच्या अदांची झलक दाखवली. आता मुमताज मुंबई सोडून लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांना दोन मुली आहेत.  

mumtaz birthday special here are lesser known facts about do raasteactress  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumtaz birthday special here are lesser known facts about do raaste actress