
'Rajesh Khanna-अंजू महेंद्रू यांचे ब्रेकअप माझ्यासाठी मोठा धक्का होता', 75 वर्षाच्या मुमताजचा मोठा खुलासा
Mumtaz: प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनी ७० चा काळ गाजवला आहे. त्यांनी आपल्या काळात अनेक टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. राजेश खन्ना यांच्या सोबतच्या त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला खूप पसंत केलं गेलं.
दोघांनी मिळून अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तसंच त्या दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या खास फ्रेंड देखील होत्या. नुकत्याच एका मुलाखतीत मुमताज यांनी खुलासा केला आहे की अंजू महेंद्रू सोबत राजेश खन्नाचं ब्रेकअप झालं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता.(Mumtaz on Rajesh Khanna And Anju Mahendroo breakup)
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुमताज म्हणाल्या,''अंजू राजेश खन्ना यांची खूप काळजी घ्यायची.त्यांच्या खाण्या-पिण्याची तर प्रमाणापेक्षा जास्तच तिला चिंता असायची. राजेश खन्ना आपल्या पार्टनरसोबत नेहमीच डबल डेट वर जायचे,जेव्हा राजेश खन्ना-अंजू वेगळे झाले आणि हे मला कळालं तेव्हा माझ्या कल्पनेपलिकडची गोष्ट घडली असं मला वाटत होतं. कारण ती गोष्ट मला अशक्य वाटायची जेव्हा मी त्या दोघांमधील बॉन्डिंग पहायचे''.
७५ वर्षीय मुमताज म्हणाल्या,''राजेश खन्ना यांच्याकडून काही गोष्टी त्यावेळी योग्य घडल्या नाहीत. जर तुम्ही कोणाला भेटत नाही आहात,तर किमान त्याला फोन करून,भेटून त्या संदर्भात सूचित करायला हवं. तसं त्यावेळी राजेश खन्ना यांनी काहीच केलं नाही''.
'आजही अंजू महेंद्रू यांच्या मनात राजेश खन्ना यांच्याविषयी भावूक भावना आहेत का?' असा प्रश्न मुमताज यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या,''अंजूने कधीच आपल्या ब्रेकअपविषयी काही सविस्तर सांगितलं नाही..ना तेव्हा ना आज''.
मुमताज आणि राजेश खन्ना यांनी 'दो रास्ते','आप की कसम','सच्चा झूठा' असे अनेक हिट सिनेमे दिले. नुकत्याच त्या इंडियन आयडॉलच्या सेटवर उपस्थित राहिल्याचं दिसलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,''राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांचे ट्युनिंग इतकं चांगलं होतं की लोकांना वाटायचं आमचं अफेअर सुरु आहे''.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या होत्या, राजेश खन्नांना तेव्हा वाटायचं की मुमताजनी फक्त त्यांच्यासोबतच काम करावं.
त्या म्हणाल्या, ''कोणा दुसऱ्या अभिनेत्यासोबत माझ्या सिनेमाची घोषणा झाली की राजेश खन्ना खट्टू होऊन कोपऱ्यात जाऊन बसायचे. त्यांनी स्वतः शर्मिला टागोरसोबत इतके सिनेमे केले पण मी फक्त त्यांच्यासोबतच काम करावं असं त्यांना वाटायचं''.
माहितीसाठी इथं सागतो की, १९७४ मध्ये लग्न केल्यानंतर मुमताज यांनी सिनेमात काम करणं हळूहळू बंद केलं.