मुन्नीनंतर आता 'मुन्ना' होणार बदनाम!

टीम ईसकाळ
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सलमानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणी नेहमीच हिट होतात. काल सलमानने 'दबंग 3'मधलं आणखी एक गाणं शेअर केलं. हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला 'मुन्नी बदनाम हुई'ची आठवण नक्की येईल.

सलमानच्या 'मुन्नी बदनाम हुई'वर आजही चाहते थिरकताना दिसतात. मागचे काही दिवस सगळीकडे 'दबंग 3'ची चर्चा होतीय. सलमानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणी नेहमीच हिट होतात. काल सलमानने 'दबंग 3'मधलं आणखी एक गाणं शेअर केलं. हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला 'मुन्नी बदनाम हुई'ची आठवण नक्की येईल.

सलमानने काही तासांपूर्वी एक ऑडिऑ गाणं शेअर केलंय आणि या गाण्याचं नाव चक्क 'मुन्ना बदनाम हुआ' असं आहे. सलमानने ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'कमाल खान की आवाज, बादशाह का रॅप और चुलबुल की दबंगायी सुनीये...' मुन्ना बदनाम हुईला कमाल खानच्या आवाजाने व बादशाहच्या रॅपने चार चाँद लावलेत. साजिद-वाजीदने या गाण्याला संगीत दिले असून, दानिश शबरीने हे गाणे लिहिले आहे. हे गाणे रिलीजनंतर काही तासांतच सोशल मीडियावर गाजले. 

गेले अनेक दिवस दबंग 3 ची चर्चा सर्वत्र आहे. सलमानसोबत या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरही दिसेल. तसेच सोनाक्षी सिन्हा हीच मुख्य भूमिकेत दिसेल. सलमानची चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा चाहत्यांना नेहमीच भावते. याही चित्रपटात तो अशाच दबंग अंदाजात दिसेल. 

मलायका अरोरावर चित्रित झालेल्या मुन्नी बदनाम हुईला लोकांनी डोक्यावर घेतले होते. आता मुन्नीनंतर सलमानने मुन्नालाही बदनाम केलंय. आता हा मुन्ना लोकांच्या पसंतीस किती उतरतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Munna Badnam hua audio song released from Dabangg 3