मुन्नाभाई कडून 'जादू की झप्पी' घेणारे सुरेंद्र राजन यांचा बॉलीवूडला रामराम..

ज्येष्ठ अभिनेते सुरेंद्र राजन यांनी मनोरंजन विश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Surendra Rajan To Retire From Films
Surendra Rajan To Retire From Films sakal

गुंडगिरी, प्रेम आणि समाजाप्रती आस्था अशा तीन विविध बाजूंचा संगमी साधणारा संजय दत्त (sanjay dutt)चा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna Bhai MBBS) हा चित्रपट पहिला नसेल असे क्विचितच आढळतील. एमबीबीएस होण्यासाठी मुन्नाभाईने केलेला आटापिटा अजूनही आपल्याला हसवून जातो. या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे सहज आपल्याला भावनिक करून जातात. असाच एक प्रसंग म्हणजे चित्रपटात एक मकसूद नावाचा नावाचा सफाई कामगार फरशी पुसत असतो आणि लोक त्यावर पाय देऊन पुढे जात असतात. आणि मग काय त्या वैतागलेल्या मकसूद चाचाला संजय दत्त म्हणजे मुन्नाभाई जाऊन एक घट्ट मिठी मारतो आणि त्याच्या कामाबद्दल त्याचे आभार मानतो.

Surendra Rajan To Retire From Films
माधुरी थिएटरच्या पडद्यावर नाचत होती अन लोक वेड्यासारखे पैसे उडवत होते..

यातील मकसूद चाचा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते 'सुरेंद्र राजन'. सध्या त्यांनी बॉलीवूड मधून निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे. त्यांचे वय सध्या ८४ वर्षे आहे. आजवर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमधून अनेक दिग्गजांसोबत अभिनय केला आहे. आता ‘हू ॲम आय’ (Who Am I) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटानंतर ते अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार आहेत.

Surendra Rajan To Retire From Films
रानबाजार : १८ वर्षांखालील मुलांनी पाहू नये असा प्राजक्ता आणि तेजस्विनीचा बोल्ड सिन

सुरेंद्र (sur3endra rajan retire) यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर लंडन येथे होणाऱ्या 24व्या युके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडणार आहे. राजन यांनी आतापर्यंत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’, ‘आर. राजकुमार’, ‘फंस गये रे ओबामा’, ‘धमाल’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी काही चित्रपटांमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका देखील केली आहे.

शेवटच्या चित्रपटाच्या आधीसुद्धा राजन यांनी काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ते उत्तराखंडमध्ये राहायला गेले होते. मात्र बॉलिवूडला रामराम करण्याआधी त्यांनी आणखी एका चित्रपटात काम करायचं ठरवलं आणि ‘हू ॲम आय’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांनी कोविडच्या काळात मध्यप्रदेशपर्यंत प्रवास केला होता. पुढे ते लाॅकडाऊनमुळे बराच काळ मुंबईतही अडकून पडले होते. या दरम्यान राजन यांच्याकडे मुंबईत घराचं भाडं भरायलासुद्धा पैसे नव्हते. त्यावेळी अभिनेता सोनू सूदने त्यांची मदत केली होती. असे हे सुरेंद्र राजन आता मनोरंजन विश्वातून विश्रांती घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com