"मुन्ना मायकल' मायकल जॅक्‍सन यांना समर्पित 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

मुंबई : विक्की राजानी निर्मित व साबीर खान दिग्दर्शित "मुन्ना मायकल' चित्रपट ख्यातनाम पॉप सिंगर, डान्सर दिवंगत मायकल जॅक्‍सन यांना समर्पित केला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री निधी आगरवाल व अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी नृत्यकौशल्य दाखवणार आहेत. यापूर्वी प्रदर्शित झालेला "हॅप्पी न्यू इयर' चित्रपट असो किंवा "एबीसीडी' या सांगीतिक चित्रपटांपेक्षा "मुन्ना मायकल' हा चित्रपट नक्कीच वेगळा असेल, असा दावा निर्माते विक्की राजानी आणि दिग्दर्शक साबीर खान यांनी केला आहे. 

टायगर आणि साबीर खान यांचा "मुन्ना मायकल' हा तिसरा चित्रपट आहे. साबीर खान यांनी सांगितले की, "मी हा चित्रपट केवळ टायगरसाठी करतो आहे. सांगीतिक चित्रपटाच्या निर्मितीबाबत टायगरने मला विचारले. अशा पद्धतीचे सांगीतिक चित्रपटांची निर्मिती फार होत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने हा अनुभव मला घेता येणार असल्याने मी लगेचच होकार दिला. या चित्रपटात मैत्रीचे बॉडिंग असून, त्यात संगीत व नृत्य आहे. त्याचबरोबर या चित्रपटात वडील आणि मुलाचा एक इमोशनल ड्रामा पाहायला मिळणार आहे. संगीतावर आधारलेला हा चित्रपट मायकल जॅक्‍सन यांना समर्पित केला आहे.' 
निर्माते विकी राजानी म्हणाले की, मला विविध जॉनरचे चित्रपट करायला आवडतात. त्यामुळेच यापूर्वी आलेल्या सांगीतिक चित्रपटाबद्दल फार विचार न करता "मुन्ना मायकल'चे कथानक वेगळे असल्याने आर्थिक धोका पत्कारला. "मुन्ना मायकल' चित्रपटासाठी आम्हाला अनेक वेळा परदेशी जावे लागले. बाहेरचे कोरियोग्राफर, तज्ज्ञ व अन्य टीम बाहेरून आणावी लागली; पण हा चित्रपट करताना कुठेही आर्थिक तडजोड केली नाही.'  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: munna michael