मुरांबाचा गोडवा ५० व्या दिवशी सुद्धा कायम!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे: पूर्वी मनोरंजनाची साधनेच कमी असल्यामुळे, एकपडदा चित्रपटगृह असल्यामुळे मराठी चित्रपटांची ‘गोल्डन ज्युबिली’, ‘सिल्व्हर ज्युबिली’ साजरी व्हायची पण आता मनोरंजनाची साधने वाढली, मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपटांसोबतच इंग्रजी, इतर प्रादेशिक चित्रपटांची स्पर्धा करायला लागत आहे आणि अशातच ‘मुरांबासारखा’ चित्रपट ५० दिवस यशस्वीरीत्या चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे. 

हल्ली होणाऱ्या मोठ्या रिलीज मुळे जुन्या काळातला पन्नास आठवड्यांचा गोल्डन ज्युबिली आता पन्नास दिवसांचा झाला आहे.

गेल्या काही वर्षात फक्त कॉर्पोरेट स्टुडिओ ने मार्केटिंग केलेले मराठी चित्रपट म्हणजे चालणारच अशी धारणा होत चालली होतीे, परंतु प्रत्येक जण रीलेट करू शकेल अशी वरुण नार्वेकरची कथा, आणि तितकेच परफेक्ट दिग्दर्शन, अमेय मिथिलाची केमिस्ट्री आणि सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित यांनी साकारलेले कूल ‘आई-बाबा’ आणि दशमी स्टुडिओ च्या नितीन वैद्य, अपर्णा पाडगावकर, निनाद वैद्य ,प्रतिसाद चे अनिश जोग, आणि ह्युज प्रोडक्शन चे  रणजित गुगळे या निर्मात्यांनी केलेल्या अफलातून मार्केटिंगमुळे 'मुरांबा'या चित्रपटाची गोडी सलग ५० दिवस प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिली आहे.

Web Title: Muramba movie fifty days esakal news