ऑनलाईन नाटकासाठी संगीतकार अजित परबने केला वेगळा प्रयोग; वाचा सविस्तर... 

ऑनलाईन नाटकासाठी संगीतकार अजित परबने केला वेगळा प्रयोग; वाचा सविस्तर... 

मुंबई : हृषिकेश जोशी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले इंटरनेटवरील पहिले ऑनलाईन नाटक म्हणून सध्या ज्याची चर्चा होत आहे, ते म्हणजे ‘मोगरा’नाटक. या नाटकात हृषिकेश जोशीबरोबरच स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयुर पालांडे आणि वंदना गुप्ते हे आघाडीचे कलाकार यात आहेत आणि विविध शहरे आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. नाटकातील पाचही व्यक्तिरेखांना संगीताचा वेगवेगळा प्रकार वापरत एक वेगळा प्रयोग गायक व संगीतकार अजित परब यांनी केला आहे. 

मोगरा या नाटकाचे संगीत दिग्दर्शन अधिक मनोरंजक आणि उत्कंठावर्धक झाले. खरं तर अजित परबचा अशा प्रकारे संगीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आणि तो पहिल्याच फोनवर ओके झाला. कारण ही संकल्पना ऐकून अजित कमालीचा एक्साईट झाला. अजित सांगतो की “मोगरा’ला संगीत देशील का, विचारण्यासाठी माझा मित्र हृषिकेशने मला फोन केला आणि ती संकल्पना ऐकूनच मी एक्साईट झालो. कारण असा प्रयोग आतापर्यंत माझ्या माहितीत तरी झालेला नाही. अशा प्रकारे ऑनलाईन प्रयोग होणार आहे आणि त्याचे संगीत दिग्दर्शन करायचे आहे, याचे अप्रूप होते. 

जेव्हा तालमी सुरू झाल्या तेव्हा मात्र ऑनलाईन नाटकाला संगीत देण्यामागील अडचणी, मर्यादा लक्षात येऊ लागल्या. ते कसे ऐकू येणार आहे, संगीतामधील लोज किंवा फ्रीक्वेंशी ज्या कट होतात ते ऑनलाईन कसे साधायचे याचा विचार करत त्या दृष्टीने काम करणे गरजेचे होते. यातील ज्या पाच व्यक्तिरेखा आहेत त्या सर्वांना संपूर्णतः वेगळे पाच संगीत प्रकार वापरायचे आम्ही ठरवले आणि त्यामुळे हा प्रयोग अधिकच इंटरेस्टिंग झाला आणि त्यामुळे अधिक मजा आली.

अजित परबने 'दे धक्का', 'नटसम्राट', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', '....आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' अशा कित्येक मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. काही मराठी चित्रपटांमध्ये त्याने कामही केले आहे. ऑनलाईन नाटकाला संगीत देण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. 
----
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com