संगीतप्रेमींसाठी 'सकाळ' घेऊन येत आहे 'दरबार स्वरांचा', सुरांच्या ९ महारथींसोबत अनुभवा गप्पा-गोष्टी आणि मैफिल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

सध्या सगळेचजण लॉकडाऊनमध्ये सोशल मिडीयाचा जास्त वापर करताना दिसत आहेत..म्हणूनंच आम्ही सकाळच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहेत एक खास कॉन्सर्ट ज्याचं नाव आहे 'दरबार स्वरांचा'. या स्वरांच्या दरबारात तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज असणार आहेत एकूण ९ सुरांचे महारथी.

मुंबई- देशातील लॉकडाऊनमुळे सध्या प्रत्येकजण घरात बसून आहे. पण मन रमवण्यासाठी काहीना काही मनोरंजनात्मक तर हवंच ना. सध्या सगळेचजण लॉकडाऊनमध्ये सोशल मिडीयाचा जास्त वापर करताना दिसत आहेत..म्हणूनंच आम्ही सकाळच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहेत एक खास कॉन्सर्ट ज्याचं नाव आहे 'दरबार स्वरांचा'. या स्वरांच्या दरबारात तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज असणार आहेत एकूण ९ सुरांचे महारथी आणि ही मैफिल तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे सकाळच्या अधिकृत फेसबुक आणि युट्युब पेजवर १ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत. काय मग तयार आहात ना? 

हे ही वाचा: लॉकडाऊनमुळे अभिनेत्री भूमी पेडणेकरवर आली ही वेळ, घरातंच उगवली मिरची, वांगी आणि स्ट्रॉबेरी

तसं पाहायला गेलं तर कोणतीही कॉन्सर्ट अनुभवण्यासाठी आपल्याला हजारोंची तिकीटं काढावी लागतात. लॉकडाऊनमध्ये देखील सोशल मिडीयावर सध्या असे अनेक प्रसिद्ध गायकांचे कॉन्सर्ट ऐकण्यासाठी रसिक तिकिटे काढून त्यांचं मनोरंजन करुन घेत आहेत. मात्र सकाळ तुम्हाला ही सुरेल मैफिल अनुभवण्याची विनामुल्य संधी देत आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सकाळी ११ ते २ या वेळेत कोणत्या गायकांना ऐकण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे त्यांची ओळख करुन देत आहोत.

भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला एक समर्थ परंपरा आहे. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे असा हा वारसा कित्येक पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. ज्यांना हा घराण्याचा वारसा आपल्या घरातूनंच मिळाला असे आजचे ताज्या दमाचे, देश विदेशात आपल्या जयपूर-आग्रा घराणा शैलीचे आणि त्याहीपेक्षा गायनात स्वतंत्र ठसा उमटवतानाच आपल्या वडिलांचे म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी यांची आठवण ताजे करणारे गायक म्हणजे पंडित शौनक अभिषेकी.. पंडित शौनक अभिषेकी यांचा सुरांचा अभ्यास किती पक्का आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहित आहे आणि म्हणूनंच या गायकाबदद्लच्या गप्पा आणि त्यांची सांगितिक मैफल ऐकण्याची संधी सकाळ तुम्हाला देत आहे  १ मे रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत.

Image

आजच्या संगीत विश्वातला एक दमदार आवाज असणारा गायक-नट..या गायक-नटाला एका संपन्न परंपरेचा वारसा आहे. त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे महाराष्ट्रातले प्रख्यात गायक-नट होते.  वसंतराव देशपांडे यांचा उल्लेख पु.ल. देशपांडे यांनी एक स्वतंत्र घराणं असा केलेला आहे. वसंतरावांची तालीम जरी राहुल यांना मिळाली नसली तरी त्यांची दमदार गायिकी राहुल देशपांडे यांच्या रुपाने समोर येते.. दिल की तपीश, घेई छंद, अलबेला या गाण्यांची फर्माईश त्यांचे चाहते नेहमी करत असतात..सध्या लॉकडाऊनमुळे राहुल त्यांच्या फेसबुक लाईव्ह द्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतंच असतात तेव्हा या प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्यासोबतच्या गप्पा आणि त्यांची सुरांची मैफिल ऐकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे १ मे रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत.

sakal news

आपल्या जादुई आवाजाने रसिकांना वेड लावणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता तरुण गायक महेश काळे. 'सुर नवा ध्यास नवा' या संगीत रिऍलिटी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत होता.. महेश गेली कित्येक वर्ष अमेरिकेत होता मात्र त्याची सगळी मुळं ही भारतामध्ये मुंबई-पुण्यामध्ये आहेत. अमेरिकेत संगीत रुजवणारा मराठी तरुण गायक महेश काळे हा पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा शिष्य आहे. हे सुरांनो चंद्र व्हा, सुरत पिया की, सुर निरागस हो, मन मंदिरा यांसारखी कित्येक गाणी, नाट्यसंगीत गात महेश काळे याने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. महेश काळे यांच्याकडून आणखी बरंच काही जाणून घेण्याची आणि त्यांच्या सुरांमध्ये मंत्रमुग्ध होण्याची संधी सकाळ तुम्हाला देत आहे १ मे रोजी दुपारी १ ते २ या वेळेत. 

Image

याशिवाय पं. आनंद भाटे, पं. विजय घाटे, रोनु मजुमदार, सुकन्या रामगोपाल यांसारख्या दिग्गजांची मैफिल देखील तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे मात्र याविषयीची अधिक माहिती आम्ही तुम्हाला आमच्या पुढच्या लेखात देऊ. तेव्हा या लॉकडाऊनमध्ये सकाळसोबत १ मे रोजी 'दरबार स्वरांचा' अनुभवायला तयार आहात ना? लवकरंच भेटू.

for music lovers here is a great oppurtunity to listen great singers as sakal media presents darbar swarancha concert on 1st may   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for music lovers here is a great oppurtunity to listen great singers as sakal media presents darbar swarancha concert on 1st may