नेटफ्लिक्सवरील या 10 सर्वाधिक प्रभावी मालिका एकदा पाहाच

युगंधर ताजणे
Thursday, 15 October 2020

कोरोनाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने वेबसीरिज रिलीज झाल्या. यात अनेक ऑनलाईन स्ट्रिमिंग करणा-या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र यात सर्वाधिक यशस्वी झालेल्या नेटफ्लिक्सने एकापेक्षा एक सरस अशा वेबसीरिज झटपट रिलीज केल्या.

मुंबई - कोरोनाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने वेबसीरिज रिलीज झाल्या. यात अनेक ऑनलाईन स्ट्रिमिंग करणा-या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र यात सर्वाधिक यशस्वी झालेल्या नेटफ्लिक्सने एकापेक्षा एक सरस अशा वेबसीरिज झटपट रिलीज केल्या. त्याला भारतीय प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अद्य़ाप यातील 10 टेलिव्हिजन शो असे आहेत की ज्या मोस्ट अॅडकटिव्ह म्हणून प्रसिध्द आहेत. तुम्ही अजूनपर्यत त्या पाहिल्या नसतील तर एकदा त्या जरुर पाहा. 

  1.  माईंडहंटर - 
 एका आगळ्यावेगळ्या प्रकारची मालिका म्हणून माईंडहंटरचा उल्लेख करावा लागेल. क्राईम, ड्रामा, रोमान्स या जॉनरमधील ही मालिका आतापर्यत लाखो प्रेक्षकांनी पाहिली आहे.  थेट 1970 च्या काळात घेऊन जाणा-या या शो मध्ये दोन एफबीआय एजंटसच्या माध्यमातून आपल्यासमोर गोष्ट मांडण्यात आली आहे. सीरीयल किलर हा या मालिकेचा मुख्य विषय असून एडी केम्परची भूमिका कॅमेरुन ब्रिटनने केली आहे. 

Mindhunter Season 3: Actors Released From Their Contract

2. ग्रेस अँड फ्रँकी - 
दोन स्त्रिया त्यांचे वैवाहिक आयुष्य त्यातील गंमती जमती, निर्णायक प्रसंग याविषयीचे प्रभावी चित्रण ग्रेस अँड फ्रँकी या मालिकेत पाहायला मिळते. अशा दोन स्त्रिया ज्यांना त्यांचे नवरे सोडून गेल्यावर एकत्र येतात त्यावेळी घडणा-या गोष्टी, संघर्ष यात मांडण्यात आला आहे. तुम्ही जर एका चांगल्या कॉमेडी शो च्या शोधाल असाल तर ग्रेस अँड फ्रँकी  हा बेस्ट ऑप्शन आहे. 

Grace And Frankie Season 7- Here's What We Know about The Expected Release  Date.
 
3. केबल गर्ल्स - 
मुळ स्पॅनिश भाषेत लास चिकास डेल केबल या भाषेत असणारी ही मालिका फेमिनिस्ट या प्रकारात मोडणारी आहे. तिला मिळालेला प्रेक्षकवर्ग मोठा आहे. 1920 काळात माद्रिद याठिकाणी घडणारी गोष्ट प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे आहे. एका राष्ट्रीय टेलिफोन कंपनीत काम करणा-या त्या चार महिला ज्या स्त्रीवादाने फार प्रभावित झाल्या आहेत.

Cable Girls season 5: Netflix renewal status, air date and more! – HITC

 4. कॉमेडियन्स ऑफ द वर्ल्ड -
स्टँड अप कॉमेडी हा प्रकार फारसा माहित नाही असा व्यक्ति सापडणे दुर्मिळ आहे. तुम्हाला त्याप्रकारात रस असेल तर या मालिकेचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे पाहताना आपण एका वेगळ्या कॉमेडीयन्सच्या जगात प्रवेश केला आहे. याचा फील तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही.

Netflix Is Bringing Together Comedians From Around The World, But Will You  Watch?

5. सेक्स एज्युकेशन - 
सुपर, अमेझिंग या शब्दांत सेक्स एज्युकेशनबद्दल सांगता येईल. या मालिकेच्या नावातच सगळे आल्याने ती पाहणा-याला आपण काही वेगळेच पाहतो आहोत हे जाणवेल. ज्या शब्दाला सगळे एवढे घाबरतात ती तर आपली रोजची गोष्ट आहे हे ओटीसला जाणवते. त्यानंतर तो एक वेगळा प्रयोग करतो. तो कुठला हे पाहण्य़ासाठी सेक्स एज्युकेशन पाहावी लागेल.

sex education: 'Sex Education' season 3 to start production in August after  getting delayed due to Covid-19 pandemic - The Economic Times

6. साल्ट फॅट अॅसिड हीट - 
तुम्ही फुडी आहात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याची आवड आहे तर मग ही मालिका तुमच्यासाठी आहे. बाजारात जाऊन भाजी खरेदी करणे, आवडीचा पदार्थ बनविण्यासाठी नेमक्या कुठल्या प्रकारची पूर्वतयारी करावी लागते हे सर्व काही या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. 

Salt, Fat, Acid, Heat' is Netflix's first how-to cooking show | PhillyVoice

7. डार्क टूरिस्ट - 
पत्रकार डेव्हिड फॅरियर हे त्याच्या आणखी एका सहका-याला घेऊन वेगवेगळ्या भागात फिरत असतात. ते यावेळी काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांनाही भेटी देतात. भटकंतीची आवड असणा-यांसाठी डार्क टूरिस्टचा ऑप्शन बेस्ट आहे. डेव्हिडच्या नाविन्याने भरलेल्या भटकंतीचा आपणही एक भाग होऊन जातो. 

Dark Tourist season 2: Why the show is not yet renewed?

8. यु - 
ही मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षक सातत्याने वेगवेगळे प्रश्न विचारत राहतात. यामागील नेमकं कारण काय याचे उत्तर तुम्ही यु ही मालिका पाहिल्यावर कळते. आतापर्यत सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेल्या मालिकांच्या यादीत यु चा क्रमांक वरचा आहे. पेन बॅडग्ले हा एका पुस्तकांच्या दुकानात काम करणारा युवक सतत सुंदर तरुणींवर लक्ष ठेवून असतो. त्याचे वागणेही इतरांपेक्षा निराळेच आहे. 

You Review | TV Show - Empire

 9. अमेरिकन व्हँडल - 
 क्राईम या जॉनर प्रकारातील एका वेगळ्या धाटणीची मालिका म्हणून अमेरिकन व्हँडल पाहावी लागेल. ज्यांना कॉमेडी मालिका पाहण्याची आवड आहे अशांनी ही मालिका न पाहिलेलीच बरी. दोन भागांमधील ही मालिका क्राईम मॉक्युमेंटरी म्हणून लोकप्रिय झाली आहे. एका ठराविक साच्यातील मालिका पाहण्याची सवय असणारे या मालिकेला नाके मुरडण्याची शक्यता अधिक आहे.

American Vandal - Season 1 - Review

10. इलाईट - 
 आता जो कुणी ईलाईटबद्दल बोलतो. त्याचे कारणही तसेच आहे. टीन ड्रामा म्हणून या मालिकेकडे पाहिले जाते. स्पेन मधल्या एका प्रख्यात शाळेत ती तीन मुले शिकतात. त्यांच्यातील रुसवे - फुगवे, वाद, याचे प्रभावी चित्रण या मालिकेत आहे. एका भयानक प्रसंगाला सामोरे जाताना त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. ते कसे हे पाहण्यासाठी या वेगळ्या प्रकारच्या मालिकेचा आनंद घ्यायला हरकत नाही. 

Elite Season 4 Release Date & Storyline? - Pop Culture Times
  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: must watched 10 famous television show on Netflix