ट्रम्पपेक्षा माझी मुलगी अमेरिकेचा चांगला कारभार बघेल; टीव्हीस्टार किमच्या वक्तव्याने खळबळ

टीम ई सकाळ
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्यापेक्षा माझी मुलगी अमेरिकेचा चांगला कारभार बघेल. अमेरिकेला प्रगती पथावर नेईल असा टोला टीव्ही स्टार किम करदाशियांने लगावला आहे. विशेष बाब अशी की तिची मुलगी नाॅर्थ वेस्ट ही आहे केवळ चार वर्षांची. 

न्यूयाॅर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्यापेक्षा माझी मुलगी अमेरिकेचा चांगला कारभार बघेल. अमेरिकेला प्रगती पथावर नेईल असा टोला टीव्ही स्टार किम करदाशियांने लगावला आहे. विशेष बाब अशी की तिची मुलगी नाॅर्थ वेस्ट ही आहे केवळ चार वर्षांची. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभारवर सध्या अमेरिकन नागरिक कमालीचे नाराज आहेत. त्यांची वक्तव्ये, त्याची वर्तणूक या सर्वच बाबींबद्दल नाराजी उमटते आहे. गेल्या आॅस्कर सोहळ्यातही अनेक कलाकारांनी ट्रम्प यांच्याविरोधात जाहीर वक्तव्ये केली होती. आता अमेरिकेची रिअॅलिटी टीव्ही स्टार किम करदाशियांनेही खळबळजनक वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. एका मुलाखतीवेळी ती म्हणाली, 'अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये आता कोणीही राहू शकते. आता जो कारभार सुरू आहे, त्यापेक्षा माझी चार वर्षाची मुलगी जास्त चांगला कारभार करेल. विनोदाचा भाग सोडा, पण अमेरिकेच्या भल्यासाठी कोणीही तिथे गेला तरी तो ट्रम्पपेक्षा चांगला कारभार करेल' 

आता हे वक्तव्य एक स्टंटबाजी आहे की तिला खरेच असे वाटते यावर खल सुरू झाला आहे. पण तिच्या या मताला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र यावर अजून काहीही टिप्पणी केलेली नाही.  

Web Title: My daughter is much better than Trump Says KIm esakal news