'नाचे..झिंग झिंग झिंगाट...'ची धडक; गाणं रिलीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

'धडक' या सिनेमातील 'नाचे..झिंग झिंग झिंगाट...' हे गाणं आज रिलीज झालं आहे.

मुंबई - 'झिंग झिंग झिंगाट...' या गाण्याने केवळ महाराष्ट्रच नाही तर जगालाही वेड लावलं आहे. हेच गाणं आता हिन्दीतूनही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मराठी झिंगाटची अद्याप जादू उतरली नसताना आता हिन्दीतील झिंगाट जादू करायला तयार आहे. 

'धडक' या सिनेमातील 'नाचे..झिंग झिंग झिंगाट...' हे गाणं आज रिलीज झालं आहे. सोशल मिडीयावर सध्या या गाण्याने धुमाकुळ घातला आहे. फुल टू धमाल हे गाणं 'सैराट' या मराठी सिनेमातील झिंगाटच्या तुलनेत लोकांचं किती कौतुक मिळवतो हे काही दिवसात कळेलच. 'सैराट' हा 2017 चा सुपरहिट सिनेमा ठरला होता.

zingat

'धडक' मधील मुख्य भूमिकेत असलेले इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्यावर चित्रीत हे गाणं आहे. या दोघांचेही पावरफुल नृत्य आपल्यालाही थिरकायला लावणारे आहे. कोरिओग्राफर फराह खानने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अमिताभ भट्टाचार्य लिखित 'नाचे..झिंग झिंग झिंगाट...' गायक अजय-अतुलने गायले आहे. आतापर्यंत 5 लाख लोकांनी हे गाणं बघितलं आहे. 

zingat

शशांक खेतान दिग्दर्शित 'धडक' सिनेमा 20 जुलैला प्रदर्शित होणार आहे. 

zingat

zingat

zingat

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nache Zing Zing Zingat song from dhadak out today