‘नागिन 4’ मध्ये निया शर्मा बनणार नागिन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

अभिनेत्री निया शर्मा ‘जमाई राजा’ मालिकेमुळे खरी प्रसिद्धीझोतात आली. आता लवकरच ती कलर्स वाहिनीवरील ‘नागिन ४’ या मालिकेतून 
प्रेक्षकांसमोर येणार आहे

मुंबई : अभिनेत्री निया शर्मा ‘जमाई राजा’ मालिकेमुळे खरी प्रसिद्धीझोतात आली. आता लवकरच ती कलर्स वाहिनीवरील ‘नागिन ४’ या मालिकेतून 
प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेत ती ‘नागिन’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘नागिन’ मालिकेची निर्माती एकता कपूरने सोशल मीडियाद्वारे 
ही आनंदाची बातमी शेअर केली.

लवकरच या मालिकेसाठी निया चित्रीकरण करणार आहे. ‘नागिन’ मालिकेच्या गेल्या तीन सिजनमध्ये अभिनेत्री मौनी रॉय, अनिता हसनंदानी, सुरभी ज्योतीसारख्या अभिनेत्रींनी नागिन ही भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या सर्व अभिनेत्रींना चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे निया नवी ‘नागिन’ म्हणून प्रेक्षकांचे मन जिंकेल का, हे पाहणं औत्सुक्‍याचे ठरेल. 

web title : in Nagin 4 nia sharma will play role of nagin


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Nagin 4 nia sharma will play role of nagin