Nagraj Manjule: खुशखबर...! नागराज मंजुळे आणखी एका मराठी सिनेमात करणार अभिनय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagraj manjule, nagraj manjule news, ghar banduk biryani, frame, amey wagh, ghar banduk biryani news, ghar banduk biryani showtiming

Nagraj Manjule: खुशखबर...! नागराज मंजुळे आणखी एका मराठी सिनेमात करणार अभिनय

Nagraj Manjule News: सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'घर बंदूक बिरयानी'. आकाश ठोसर , सयाजी शिंदे, नागराज मंजुळे या तिघांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमातुन नागराज मंजुळे एका तडफदार पोलीस ऑफीसरची भुमिका साकारणार आहेत.

याशिवाय भावना भाभी फेम सायली पाटील सुद्धा सिनेमात आकाशची हिरोईन म्हणून झळकत आहे. सिनेमात अनेक कलाकार असले तरीही खरी हवा आहे ते नागराज मंजुळेंची. 'घर बंदूक बिरयानी' नंतर आता नागराज मंजुळे आणखी एका मराठी सिनेमात अभिनय करणार आहेत.

(nagraj manjule will be acting in another marathi movie with marathi actor amey wagh)

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आपल्या चित्रपटांमधून नेहमीच नवनवीन विषयांना हात घालणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. आपल्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटामुळे सध्या ते सर्वत्र चर्चेत आले आहेत. चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.

त्याबरोबरच नागराज मंजुळेही पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहेत. ‘घर बंदूक बिरयानी’ निमित्ताने नागराज सध्या संपुर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत.

यानिमित्ताने नागराज मंजुळे यांनी एका मुलाखतीत खुलासा केलाय. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नागराज लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार असल्याचे सांगितले.

‘फ्रेम’ असे चित्रपटाचे नाव असून नागराज अभिनेता अमेय वाघसोबत दिसणार आहे; परंतु अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक किंवा निर्माता होणे जरा जास्त चांगले वाटतेय, असेही ते म्हणाले.

नागराज मंजुळेंची भुमिका असलेल्या हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून

यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.