नकुलचा अभिनय षटकार

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

सध्या छोट्या पडद्यावरचा द स्टाईलिश, कूल लुक्‍स असलेला हॅंडसम हंक कोण? असा प्रश्‍न कोणालाही विचारलात तर सगळ्यांचं उत्तर एकच असेल; ते म्हणजे द नकुल मेहता. म्हणजेच इश्‍कबाज मालिकेतील सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिरेखा शिवाय सिंग ओबेरॉय. नकुलच्या द शिवाय सिंग ओबेरॉयच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. छोट्या पडद्यावरचा हा हिरो वेब सीरिजच्या विश्‍वातही तितकाच लोकप्रिय आहे. तो इश्‍कबाज मालिकेंचं शूटिंग सुरू होण्याआधी "आय डोन्ट वॉच टीव्ही' या वेब सीरिजमध्ये काम करत होता आणि त्यानंतर त्याने लगेचच इश्‍कबाज मालिकेला होकार दिला. त्यामुळे त्याचे फॅन्स त्याची वेब सीरिज आणि मालिका दोन्हींचा आनंद घेऊ लागले.

सध्या छोट्या पडद्यावरचा द स्टाईलिश, कूल लुक्‍स असलेला हॅंडसम हंक कोण? असा प्रश्‍न कोणालाही विचारलात तर सगळ्यांचं उत्तर एकच असेल; ते म्हणजे द नकुल मेहता. म्हणजेच इश्‍कबाज मालिकेतील सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिरेखा शिवाय सिंग ओबेरॉय. नकुलच्या द शिवाय सिंग ओबेरॉयच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. छोट्या पडद्यावरचा हा हिरो वेब सीरिजच्या विश्‍वातही तितकाच लोकप्रिय आहे. तो इश्‍कबाज मालिकेंचं शूटिंग सुरू होण्याआधी "आय डोन्ट वॉच टीव्ही' या वेब सीरिजमध्ये काम करत होता आणि त्यानंतर त्याने लगेचच इश्‍कबाज मालिकेला होकार दिला. त्यामुळे त्याचे फॅन्स त्याची वेब सीरिज आणि मालिका दोन्हींचा आनंद घेऊ लागले. कित्येकांना तर आश्‍चर्य वाटतं की, दोन वेगवेगळ्या भूमिका तो कशा करतो, त्याचे फॅन्स त्याला थेट असे प्रश्‍न ट्‌विटरवरच विचारतात. तोही त्यांची मनापासून उत्तरं देतो. कुणालाही निराश करत नाही. कारण शूटिंगच्या वेळा सांभाळणं आता त्याला चांगलंच जमू लागलंय. इश्‍कबाज आणि त्याचाच पुढचा भाग असणारी "दिल बोले ओबेरॉय' ही मालिका आणि त्यानंतर आता एका नव्या वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याचं नुकतंच नकुलने जाहीर केलं. त्यामुळे नकुलच्या अभिनयावर खुश असलेल्या फॅन्सच्या आनंदात आणखीन भर पडली आणि त्यासोबत नकुलने अजून एक सुखद धक्का दिला. तो लवकरच "गॅंगस्टर न्यूटन' या नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्याचं झालं असं, की त्याला त्याच्या "आय डोन्ट वॉच टीव्ही' या वेब सीरिजमधील भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या आनंदात खुश होऊन नकुलने इस्टाग्रामवर स्वतःच्या स्विमिंग पुलमध्ये हातात पुरस्कार घेतलेला फोटो पोस्ट करून त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये आपल्या नव्या वेब सीरिजचं नावही सांगितलं. नकुलची ही नव्या वेब सीरिजची बातमी त्याच्या फॅन्ससाठी नकुलच्या अभिनयाचाच षटकार ठरली. द शिवाय सिंग ओबेरॉयच्या भूमिकेने छोट्या पडद्यावर आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या नकुलला डेली सोपचा कंटाळाच येतो. पण "इश्‍कबाज' या पठडीतली मालिका नाही म्हणून नकुल त्यात रमला. पण त्याने वेब सीरिजचं माध्यम कधीच दुय्यम मानलं नाही. कारण आपली व्यक्तिरेखा कशी खुलवायची हे नकुलला चांगलंच माहितेय. म्हणूनच तो जी भूमिका करतो, त्या भूमिकेच्या नावाआधी 'द' लावावंच लागतं. असा हा द नकुल मेहता... 

Web Title: Nakul mehta actor