पडद्यामागची नाना"गिरी' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

नाना पाटेकर हे इंडस्ट्रीतील बडं नाव. पण, कितीही बडं नाव असलं तरी ते किती साधे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. नाना पाटेकर "आपला मानूस' हा त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री इरावती हर्षेही या चित्रपटात काम करत आहेत. चित्रपटात नाना पोलिस ऑफिसरची भूमिका करत आहेत. चित्रपट जरी सस्पेन्स असला, तरी या चित्रपटाचे चित्रीकरण करताना त्यांनी पडद्यामागे खूप धमाल केली. "आपला मानूस' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. त्या वेळी पडद्यामागच्या गप्पा रंगल्या. या वेळी नाना बोलत होते की, "आम्ही पडद्यामागे खूप धम्माल केली आहे. सुमित खूप छान गातो.

नाना पाटेकर हे इंडस्ट्रीतील बडं नाव. पण, कितीही बडं नाव असलं तरी ते किती साधे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. नाना पाटेकर "आपला मानूस' हा त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्याबरोबर अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री इरावती हर्षेही या चित्रपटात काम करत आहेत. चित्रपटात नाना पोलिस ऑफिसरची भूमिका करत आहेत. चित्रपट जरी सस्पेन्स असला, तरी या चित्रपटाचे चित्रीकरण करताना त्यांनी पडद्यामागे खूप धमाल केली. "आपला मानूस' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. त्या वेळी पडद्यामागच्या गप्पा रंगल्या. या वेळी नाना बोलत होते की, "आम्ही पडद्यामागे खूप धम्माल केली आहे. सुमित खूप छान गातो. जेव्हा तो गाणं गायचा तेव्हा मला गाण्याचा चांगला सेन्स असल्यामुळे मी टेबलवर तबला वाजवायचो. दोन शॉटच्यामध्ये आम्ही पत्ते खेळत बसायचो आणि लाईट्‌स वगैरे लावून झालेले जरी असले, तरी आम्ही सतीशला सांगायचो की, अजून थोडावेळ लाईट्‌सचं काम कर ना. कारण आम्हाला पत्त्याचा डाव पूर्ण करायचा असायचा. सेटवर आम्ही घरून डबे घेऊन यायचो. सुमित डबा आणायचा आणि मी ही. रोज मी स्वतः जेवण बनवायचो. इरावती कधीच काही आणायची नाही (हसून.) मी खवय्यापेक्षा आचारीच जास्त चांगला आहे. मला खाण्यापेक्षा खायला घालायला खूप आवडतं. त्यामुळे मी उत्तम जेवण बनवतो.' नानांना परत एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आता आतुर झालेत... 

Web Title: nana patekar aapla manus movie