'कोण होणार करोडपती' मध्ये नानांची एन्ट्री; सांगितल्या कारगीलच्या आठवणी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत.
'कोण होणार करोडपती' मध्ये नानांची एन्ट्री; सांगितल्या कारगीलच्या आठवणी

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती'ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर (sachin khedekar) करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. 'कोण होणार करोडपती'मध्ये आठवड्यातून एक दिवस 'कर्मवीर विशेष' भाग असतो. या भागात अभिनेते 'नाना पाटेकर' कर्मवीर म्हणून येणार आहेत. (Nana Patekar entry in Kon Hoeel Marathi Crorepati)

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.

कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'कोण होणार करोडपती' मध्ये नानांची एन्ट्री; सांगितल्या कारगीलच्या आठवणी
'पाऊस, गारवा, हिरवळ...'; सोनालीच्या पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती' टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात 'कोण होणार करोडपती प्ले अलॉंग'! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी.

'कोण होणार करोडपती' मध्ये नानांची एन्ट्री; सांगितल्या कारगीलच्या आठवणी
प्राजक्ता लवकरच उलघडणार 'गुपित'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com