आता एका म्यानेत मावणार दोन तलवारी

टीम ई सकाळ
मंगळवार, 13 जून 2017

नाना पाटेकर आणि द ग्रेट रजनीकांत आता एकाच सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमाचे नाव काला असे असून यात या दोघांच्या नेमक्या काय भूमिका असतील ते कळायला मार्ग नाही.

मुंबई : नाना पाटेकर आणि द ग्रेट रजनीकांत आता एकाच सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमाचे नाव काला असे असून यात या दोघांच्या नेमक्या काय भूमिका असतील ते कळायला मार्ग नाही.

पण या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाना आणि रजनी एकत्र येणार आहेत. नाना पाटेकर यांची तुफान संवादफेक आणि रजनी यांची स्टाईल यांचा धमाका या सिनेमात पाहायला मिळे असे वाटते. अनेकांना आणखी एका गोष्टीचा विसर पडला आहे, तो असा की याच सिनेमात आणखी एक मराठी अभिनेत्री झळकणार आहे. तिचे नाव आहे अंजली पाटील. यापूर्वी राधिका आपटेने रजनीकांतसोबत कबाली या सिनेमात काम केले होते. रजनी यांच्यासोबत काम करणारी अंजली दुसरी मराठी अभिनेत्री ठरली आहे. या सिनेमाचे शूट अद्याप सूरू झाले नसून लवकरच त्याबद्दल घोषणा करण्यात येईल. 

Web Title: nana patekar rajanikanth togather esakal news