मंटो हा खूप मोठा प्रोजेक्‍ट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोची भूमिका करायला सज्ज झालाय, हे आपण सध्या ऐकतोच आहोत. पण या बायोपिकची दिग्दर्शिका नंदिता दासही खूप मेहनत घेतेय. म्हणूनच ती म्हणतेय, मंटो हा खूपच मोठा प्रोजेक्‍ट आहे. आमची संपूर्ण टीमसुद्धा खूप मेहनत घेतेय. आम्ही 15 मार्चपासून शूटिंगला सुरुवात करणार आहोत. मंटो या चरित्रपटात 1940 चा काळ आम्ही जिवंत करणार आहोत. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बॉलीवूडमधील अजून काही ओळखीचे चेहरे या चरित्रपटाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळेही उत्सुकतेचं वातावरण आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोची भूमिका करायला सज्ज झालाय, हे आपण सध्या ऐकतोच आहोत. पण या बायोपिकची दिग्दर्शिका नंदिता दासही खूप मेहनत घेतेय. म्हणूनच ती म्हणतेय, मंटो हा खूपच मोठा प्रोजेक्‍ट आहे. आमची संपूर्ण टीमसुद्धा खूप मेहनत घेतेय. आम्ही 15 मार्चपासून शूटिंगला सुरुवात करणार आहोत. मंटो या चरित्रपटात 1940 चा काळ आम्ही जिवंत करणार आहोत. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बॉलीवूडमधील अजून काही ओळखीचे चेहरे या चरित्रपटाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळेही उत्सुकतेचं वातावरण आहे. पण त्या बॉलीवूड चेहऱ्यांची नावं अजून सांगण्यात आली नसली, तरी त्यांनी छोट्या भूमिकांसाठी होकार दिलाय हीच मोठी गोष्ट आहे, असं नंदिता म्हणाली. या चित्रपटाचं बजेट खूप मोठं नसल्यामुळे शूटिंग कमीत कमी वेळात पूर्ण करण्याचा निर्धार या सिनेमाच्या टीमने केलाय. मंटो हा टिपिकल बॉलीवूडपट नसणारेय. कारण यात गाणी, नृत्य असं पठडीतलं काहीच नसणार. 
हा एक बिग बजेट नसलं तरी स्वतंत्र सिनेमा असणार आहे. पण या चित्रपटात ओम पुरी यांची जागा कोण घेणार? याविषयी नंदिता काहीच बोलली नाही. एका पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी नंदिता या सिनेमाविषयी बोलत होती. 

Web Title: nandita das and nawazuddin siddiqui monto