संगीताचा वारसा मिळाला घरातूनच...!

संगीताचा वारसा मिळाला घरातूनच...!

खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार साळोखे संवाद साधत असतात. संगीत संयोजनाबरोबरच वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणूनही काम करतात. 

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उत्तरा केळकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, रवींद्र साठे यांच्यापासून ते अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी, रणजीत बुगले यांच्यापर्यंत अनेक गायकांबरोबर काम करण्याची संधी श्री. साळोखे यांना मिळाली. ‘प्रतिआव्हान’, ‘तुम्ही सरकारी आम्ही शेतकरी’, ‘माऊली’ आदी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत दिले. त्याशिवाय ‘रंगलो विठ्ठल भक्तीत’ यासारख्या अल्बमनाही संगीत दिले. अनेक जिंगल्स, टीव्हीवरच्या जाहिरातीही केल्या. प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांच्याकडेही सहसंयोजक म्हणून त्यांनी काम केले. त्याशिवाय आजवर पाचशेहून अधिक कलाकार त्यांनी घडवले आहेत.

श्री. साळोखे यांचं शिक्षण नूतन मराठी विद्यालयात. दहावीनंतर ते पुढे शिकले नाहीत. मात्र, संगीत क्षेत्रातील दिग्गजांना साथ देत ते साऱ्या गोष्टी आत्मसात करू लागले. हार्मोनियम, सिंथेसायझर, सॅक्‍सोफोन, क्‍लेरोनेट, सुंदर, सनई, ड्रम, कोंगो अशा कैक वाद्यांच्या हुकुमी वादनात त्यांचा हातखंडा आहे. या साऱ्या प्रवासात त्यांनी स्वरमंजुषा मराठी गीतांच्या वाद्यवृंदाची निर्मितीही केली. या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं. त्यांचा सॅक्‍सोफोनचा इंस्ट्रूमेंटल वाद्यवृंदही असून ‘म्युझिक आर्ट’ नावाने तो कार्यरत आहे. श्री. साळोखे सांगतात, ‘कलापूरला संगीताची मोठी परंपरा आहे. त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच मलाही या क्षेत्रात घडत गेलो.’’

कलापूरने अनेक कलाकारांना घडविले. या क्षेत्रातील प्रचलित शिक्षण घेता आलं नाही तरी आपल्या आवडीच्या क्षेत्रात केवळ अनुभवावरही आपण गुणवत्ता सिद्ध करू शकतो, हा आत्मविश्‍वास कलापूरने आजवर दिला.
- नंदकुमार साळोखे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com